मोठी बातमी! महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी आली; या महापालिकेला मिळाला 'अनुसूचित जमाती'चा महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:06 IST2026-01-22T12:04:43+5:302026-01-22T12:06:01+5:30

KDMC Mayor ST Category : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौरपदाची सोडत जाहीर. आगामी महापौरपद 'अनुसूचित जमाती' (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणिते बदलली.

KDMC Mayor Reservation 2026: KDMC Mayor's post reservation draw announced; Post reserved for 'Scheduled Tribes' | मोठी बातमी! महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी आली; या महापालिकेला मिळाला 'अनुसूचित जमाती'चा महापौर

मोठी बातमी! महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी आली; या महापालिकेला मिळाला 'अनुसूचित जमाती'चा महापौर

KDMC Mayor Lottery: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी महापौरपदासाठी काढण्यात आलेल्या सोडतीत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. यावेळी महापौरपद 'अनुसूचित जमाती' (Scheduled Tribe - ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या अनपेक्षित आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या आणि इच्छुकांच्या राजकीय स्वप्नांना ब्रेक लागला असून, आता नव्या चेहऱ्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे.

काय आहेत आरक्षणाचे तपशील?
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडलेल्या या सोडतीत विविध प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये:

महापौरपद: अनुसूचित जमाती (ST). या प्रवर्गातील महिला की पुरुष, याबाबतची स्पष्टता आगामी पोट-सोडतीत किंवा अधिकृत राजपत्रात दिसून येईल.

राजकीय समीकरणांवर होणारा परिणाम:
कल्याण-डोंबिवलीत अनेक वर्षांपासून राजकारण करणाऱ्या खुल्या किंवा ओबीसी प्रवर्गातील दिग्गज नेत्यांना आता महापौरपदाच्या खुर्चीवर बसता येणार नाही. शिवसेना (शिंदे आणि ठाकरे गट), भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी या सर्वच पक्षांना आता आपल्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे या प्रवर्गातील सक्षम उमेदवार असेल, त्यांचे पारडे जड राहील. 

या आरक्षणामुळे आदिवासी समाजातील किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवकांना शहराच्या प्रथम नागरिक पदावर बसण्याची ऐतिहासिक संधी मिळणार आहे.

Web Title : केडीएमसी महापौर पद अनुसूचित जनजाति के लिए आरक्षित; नए चेहरे आएंगे

Web Summary : कल्याण-डोंबिवली में महापौर का चुनाव बदलेगा। पद अनुसूचित जनजाति के लिए आरक्षित, दिग्गज नेता पीछे। पार्टियाँ योग्य एसटी उम्मीदवार ढूंढ रही हैं, आदिवासी समुदाय के लिए ऐतिहासिक अवसर।

Web Title : KDMC Mayor Post Reserved for Scheduled Tribe; New Faces Emerge

Web Summary : Kalyan-Dombivli's upcoming mayoral election sees a major shift. The post is now reserved for the Scheduled Tribe category, sidelining established leaders. Parties scramble to find suitable ST candidates, offering a historic opportunity for tribal community representatives.