ventura country sheriff found naya rivera dead body at southern californian lake | अखेर पाच दिवसानंतर सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, लेकाला बोटीत ठेवून तलावात उतरली ती परत आलीच नाही

अखेर पाच दिवसानंतर सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, लेकाला बोटीत ठेवून तलावात उतरली ती परत आलीच नाही

ठळक मुद्दे  नायाने बेपत्ता होण्याआधी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला होता.

हॉलिवूड अभिनेत्री नाया रिवेरा हिचा मृतदेह अखेर पाच दिवसांनंतर  कॅलिफोर्नियातील पीरू लेकमध्ये सापडला. तब्बल 5 दिवसांनी पिरू लेकमध्ये गायब झालेल्या नायाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना सोमवारी यश आले.

 33 वर्षीय अभिनेत्री नाया  8 जुलै रोजी तिच्या 4 वर्षाच्या मुलासोबत वेंचुरा काऊंटीमधील पीरू लेकमध्ये फिरायला गेली होती. भाड्याच्या बोटीत तलावाची सैर करत असताना अचानक नायाने पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. यानंतर ती परत आलीच नाही. तिचा चार वर्षांचा मुलगा जोसी एकटाच बोटीत आढळला होता.  नाया लेकमध्ये वाहून गेली असणार, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे शोधकार्य लेकच्या आसपासच सुरू ठेवले होते. वेंच्यूरा कंट्री पोलिसांनी याबाबत काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. 


अखेर पाचव्या दिवशी वेंच्यूरा येथील कोरोनर कार्यालयापासून  64 किलोमीटर दूर नायाचा मृतदेह   सापडला.  यासंदर्भात नायाच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. लॉस एंजलिसपासून तासाभराच्या अंतरावर हा तलाव आहे. रोबोटिक डिव्हाइसच्या मदतीने गेल्या 5 दिवसांपासून याठिकाणी काही डायव्हर्स नायाचा शोध घेत होते. त्याचप्रमाणे ड्रोनच्या माध्यामातून देखील नायाचा शोध सुरू होता.

नाया तिच्या 4 वर्षाच्या मुलाबरोबर तलावामध्ये फिरण्यासाठी जाण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज शनिवारी समोर आले होते. अभिनेत्री तलावाकाठी तिचा मुलगा  गाडीतून उतरताना या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार वेन्चूरा कंट्री  पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.


 
 नायाने बेपत्ता होण्याआधी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाबरोबर एक फोटो देखील पोस्ट केला होता.

फॉक्स म्यूझिकल कॉमेडी ग्ली मध्ये नायाने Santana Lopez या चिअरलीडरची भूमिका केली होती. यातील सहाही सीझनमध्ये तिची महत्त्वाची भूमिका होती. या सीरिजमध्ये ती तिसरी अशी कलाकार आहे जिचा अवघ्या वयाच्या तिशीमध्येच मृत्यू झाला आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ventura country sheriff found naya rivera dead body at southern californian lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.