ठळक मुद्देनिकी ही एक लोकप्रिय पॉप सिंगर आहे.

पॉप सिंगर निकी मिनाजने एक गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. होय, निकी प्रेग्नंट आहे. बेबी बम्पचे काही फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही बातमी दिली.
निकी आणि तिचा पती केनेथ पेटी आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी कमालीचे उत्सूक आहेत.

‘प्रेम, लग्न आणि बाळ... उत्सुकता आणि शुभेच्छांमुळे गदगद् झालीये,’ असे बेबी बम्पचे फोटो शेअर करताना तिने लिहिले. तिने फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

निकीने एका रेडिओ शोदरम्यान केनेथसोबतच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. मी व केनेथ अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असे तिने सांगितले होते.

निकी ही एक लोकप्रिय पॉप सिंगर आहे. 2011 ते 2016 या काळात ती 10 वेळा ग्रॅमी अवार्डसाठी नॉमिनेट झाली होती. 2012 मध्ये तिने पहिला ग्रॅमी अवार्ड जिंकला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nicki minaj is pregnant with her 1st child shares pic of baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.