ठळक मुद्देनाओमीने मुलाखतीत म्हटले आहे की, ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याने चक्क माझ्या स्कर्टमध्ये हात घातला होता. हे सगळे घडले त्यावेळी त्या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर सगळेच समोर बसले होते.

जेम्स बॉण्डच्या स्काईफॉल या चित्रपटात बॉन्ड गर्लच्या भूमिकेत आपल्याला नाओमी हैरिसला पाहायला मिळाले होते. तिने याशिवाय देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण स्काईफॉल या चित्रपटामुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तिला बॉण्ड गर्ल म्हणूनच ओळखले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, नाओमीने आता एका प्रसिद्ध अभिनेत्यावर लैंगिक शौषणाचा आरोप लावला आहे. 

नाओमीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, एका ऑडिशनच्या निमित्ताने एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिचे लैंगिक शोषण केले होते. ती त्यावेळी केवळ वीसेक वर्षांची होती. तसेच अभिनयक्षेत्रात कार्यरत असताना अशा अनेक प्रकारच्या पुरुषांचा सामना करावा लागत असल्याचे देखील तिने कबूल केले. तिने या मुलाखतीत म्हटले आहे की, मी काही वर्षांपूर्वी एका ऑडिशनला गेले होते. तिथे माझ्यासोबत जे काही घडले ते खूपच विचित्र होते. या सगळ्यामुळे मला प्रचंड धक्का बसला होता. ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याने चक्क माझ्या स्कर्टमध्ये हात घातला होता. हे सगळे घडले त्यावेळी त्या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर, डायरेक्टर सगळेच समोर बसले होते. पण तो अभिनेता अतिशय दिग्गज असल्याने ते काहीच बोलले नाहीत. मला या गोष्टीचे सगळ्यात जास्त वाईट वाटते की, आजही तो स्टार इंडस्ट्रीत असून आजही त्याला तितकीच लोकप्रियता मिळत आहे. तसेच इंडस्ट्रीत आजही त्याच्या नावाला तितकेच वजन आहे.

नाओमी हैरिससोबत वाईट वर्तवणूक केलेला हा स्टार कोण होता याचे नाव तिने मुलाखतीत न सांगणेच पसंत केले आहे. या मुलाखतीत तिने पुढे सांगितले आहे की, अशाप्रकारची वर्तवणूक केल्यानंतर त्या पुरुषांना लोक माफ करणार नाहीत याची त्यांना चांगलीच कल्पना असते. पण तरीदेखील ते अशाप्रकारचे कृत्य करताना एकदा देखील विचार करत नाहीत. 

नाओमी हैरिस नो टाइम टू डाय या चित्रपटात पुन्हा एकदा बॉण्ड गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. 


Web Title: Actress Naomie Harris Alleges She Was Groped By A 'Huge Star' During An Audition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.