दिलीप प्रभावळकरांची नक्कल करणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:03 PM2023-04-06T18:03:49+5:302023-04-06T18:04:35+5:30

Dilip prabhawalkar: मराठीतला एक लोकप्रिय अभिनेता चक्क दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या भूमिका रंगमंचावर सादर करणार आहे.

zee natya gaurav puraskar sohala nilesh sable played dilip prabhawalkar roles | दिलीप प्रभावळकरांची नक्कल करणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

दिलीप प्रभावळकरांची नक्कल करणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेता म्हणजे दिलीप प्रभावळकर. नाटक, सिनेमा, मालिका अशा प्रत्येक माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनायाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. विशेष म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर कायम त्यांच्या नावाची चर्चा होत असते.  यामध्येच ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३’ मध्ये दिलीप प्रभावळकर (dilip prabhawalkar) यांना कलाविश्वाकडून सलामी देण्यात येणार आहे. यासाठी मराठीतल्या एका लोकप्रिय अभिनेत्याने त्याची कंबर कसली आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३’ या पुरस्कार सोहळ्याचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्या सन्मानार्थ 'एकाच तिकीटात अनेक प्रयोग', असं म्हणत त्यांना सलामी दिली जाणार आहे. त्यामुळे मराठीतला एक लोकप्रिय अभिनेता चक्क दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या भूमिका रंगमंचावर सादर करणार आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याने केलेल्या गेटअपमुळे तो नेमका कोण हे ओळखणंही कठीण झालं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिलीप प्रभावळकरांची भूमिका साकारणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून निलेश साबळे (nilesh sable) आहे. त्याने प्रभावळकरांचे अनेक गेटअप केले आहेत. विशेष म्हणजे यात त्याला पटकन ओळखतादेखील येत नाहीये.

दरम्यान, एकाच तिकिटात अनेक प्रयोग सादर करत, निलेश साबळे यांनी दिली दिलीप प्रभावळकरांना सलामी !, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. येत्या  9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर  ‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
 

Web Title: zee natya gaurav puraskar sohala nilesh sable played dilip prabhawalkar roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.