गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 18:12 IST2024-03-23T18:10:51+5:302024-03-23T18:12:21+5:30

'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच. तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील

the great indian kapil sharma show trailer on netflix released on 30th march 2024 | गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

गुत्थी पुन्हा आली...; 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर, आमिर खानपासून रोहित शर्मापर्यंत दिग्गज करणार धम्माल

गेल्या अनेक दिवसांपासून 'द ग्रेट इंडियन कपिल शो' ची उत्सुकता शिगेला होती. यानिमित्ताने कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर खुप वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. हा शो कधी सुरु होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या शोचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर रिलीज झालाय. आणि आनंंदाची गोष्ट म्हणजे सुनिल ग्रोव्हरची 'गुत्थी' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' निमित्ताने कपिल आणि सुनील ग्रोव्हर २०१७ मध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, रणबीर कपूर, नीतू कपूर, आमिर खान, दिलजीत दोसांज, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सारखे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. नवीन शो मध्ये कपिल शर्माच्या कलाकारांची पुन्हा एकदा तगडी टीम सर्वांना खळखळून हसवायला सज्ज आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये कपिल शर्मासोबत अर्चना पूरन सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार धम्माल करताना दिसणार आहेत. ३० मार्चपासून नेटफ्लिक्स या OTT  प्लॅटफॉर्मवर दर शनिवारी रात्री ८ वाजता 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा नवीन एपिसोड पाहायला मिळेल. या शोमध्ये पहिल्यांदाच आमिर खान आणि रोहित शर्मा सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे.

 

Web Title: the great indian kapil sharma show trailer on netflix released on 30th march 2024