काय सांगता! 'द फॅमिली मॅन ३'मधील श्रीकांत तिवारीशी भिडणार 'पाताल लोक'फेम हाथी राम चौधरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:29 IST2025-01-28T11:29:06+5:302025-01-28T11:29:43+5:30

'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावतची एन्ट्री झालीय. जाणून घ्या सविस्तर

The Family Man 3 and paatal lok 2 actor manoj bajpayee and jaydeep ahlawat will seen together | काय सांगता! 'द फॅमिली मॅन ३'मधील श्रीकांत तिवारीशी भिडणार 'पाताल लोक'फेम हाथी राम चौधरी?

काय सांगता! 'द फॅमिली मॅन ३'मधील श्रीकांत तिवारीशी भिडणार 'पाताल लोक'फेम हाथी राम चौधरी?

'द फॅमिली मॅन ३'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज वाजपेयी 'द फॅमिली मॅन ३'चं शूटिंग करत आहेत. राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडी आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे 'द फॅमिली मॅन ३' परफेक्ट होण्यासाठी कसून मेहनत घेत आहेत. अशातच 'द फॅमिली मॅन ३'विषयी एक मोठी अपडेट समोर येतेय. जी ऐकून सर्वांना सुखद धक्का बसेल. 'द फॅमिली मॅन ३'मध्ये 'पाताल लोक' फेम अभिनेता जयदीप अहलावतची एन्ट्री होणार आहे

श्रीकांत तिवारी अन् हाथीराम चौधरी आमनेसामने

 'द फॅमिली मॅन ३'विषयी सध्या अशी चर्चा आहे की, या सीरिजचं शूटिंग नागालँडमध्ये झालंय. याशिवाय 'पाताल लोक'च्या दुसऱ्या सीझनचं शूटिंगही नागालँडमध्ये झालं. त्यामुळे अशी चर्चा आहे की, जयदीप अहलावतची 'द फॅमिली मॅन ३'मध्ये एन्ट्री झाली आहे. इतकंच नव्हे जयदीप आणि मनोज यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसणार आहे. आता खरंच असं घडलं तर, 'द फॅमिली मॅन ३' बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.


कधी रिलीज होणार  'द फॅमिली मॅन ३'

मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असलेली बहुचर्चित  'द फॅमिली मॅन ३' वेबसीरिज कधी रिलीज होणार असा प्रश्न सर्वांना पडलाय. काहीच दिवसांपूर्वी  'द फॅमिली मॅन ३'चं शूटिंग संपलं आणि wrap up पार्टी करण्यात आली. अशातच  'द फॅमिली मॅन ३'चं सध्या एडिटींगचं काम सुरु असून ही वेबसीरिज या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे. याविषयी अधिकृत माहिती अजून समोर आली नाहीये.

Web Title: The Family Man 3 and paatal lok 2 actor manoj bajpayee and jaydeep ahlawat will seen together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.