रोमान्स, प्रेमात धोका अन्...; ओटीटीवरील 'हा' मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून चक्रावून जाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:13 IST2026-01-29T14:11:44+5:302026-01-29T14:13:46+5:30

हल्ली बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील क्राइम थ्रिलर सिनेमाच्या निर्मितीवर भर देत आहेत. कारण, असे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.

tapsee pannu and vikrant massey starrer haseen dilruba trending on netflix suspense unforgettable  | रोमान्स, प्रेमात धोका अन्...; ओटीटीवरील 'हा' मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून चक्रावून जाल 

रोमान्स, प्रेमात धोका अन्...; ओटीटीवरील 'हा' मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून चक्रावून जाल 

OTT Movie: हल्ली बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील क्राइम थ्रिलर सिनेमाच्या निर्मितीवर भर देत आहेत. कारण, असे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. त्यात काही चित्रपटांच्या कथा आणि त्यातील सस्पेन्स विचार करायला भाग पाडतात. असाच एक चित्रपट  ज्याने आपल्या दमदार कथानक आणि थक्क करणाऱ्या क्लायमॅक्समुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.शिवाय या चित्रपटाची ओटीटीवरही प्रचंड लोकप्रियता मिळते आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक चित्रपट उपलब्ध आहेत ज्यात ट्विस्ट आणि टर्न्स पाहून शेवटपर्यंत स्क्रिनवरून नजर हटणार नाही. मात्र,या सगळ्यात हसीन दिलरुबा या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळताना दिसते. २०२१ साली हा सिनेमा रिलीज झाला होता. ज्यामध्ये तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  त्यानंतर २०२४ मध्ये सिनेमाचा सीक्वल आा. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट रोमान्स आणि मर्डर मिस्ट्रीचा एक मिलाफ दाखवतो.२ तास १६ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत सस्पेन्समध्ये ठेवतो.ही केवळ हत्येची कहाणी नसून तर प्रेम आणि विश्वासघाताची कहाणी आहे.आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. 

हसीन दिलरुबाची कथा एका छोट्याशा गावात सुरु होते. राणी आणि रिशूची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. लग्नानंतर त्यांच्या नात्यात कटूता येते आणि ते एकमेकांपासून दुरावले जातात. दरम्यान, नील नावाचा एक माणूस राणीच्या आयुष्यात प्रवेश करतो. त्यानंतर कथेला एक अनपेक्षित वळण लागतं. एक खून प्रकरण उघडकीस येते, ज्यामुळे आणखी गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे हा खून करणारा खरा गुन्हेगार कोण आणि हत्या कशी होते. चित्रपटातील हा सस्पेन्स शेवटपर्यंत बांधून ठेवतो. 

Web Title : रोमांस, धोखा, कत्ल: ओटीटी फिल्म का सस्पेंस दर्शकों को बांधे रखता है।

Web Summary : 'हसीन दिलरुबा', रोमांस और मर्डर मिस्ट्री का मिश्रण, दर्शकों को ट्विस्ट और टर्न से बांधे रखती है। रानी और रिशु की तनावपूर्ण शादी विश्वासघात और एक चौंकाने वाले कत्ल के साथ एक दुखद मोड़ लेती है, जो अंत तक रहस्य बनाए रखती है।

Web Title : Romance, betrayal, murder: OTT film's suspense grips viewers.

Web Summary : The film 'Haseen Dillruba,' a mix of romance and murder mystery, keeps viewers hooked with twists and turns. Rani and Rishu's strained marriage takes a dark turn with betrayal and a shocking murder, maintaining suspense until the very end.