आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून हटवलं तमन्ना भाटियाचं गाणं 'गफूर'?, निर्माते म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:56 IST2025-09-19T10:55:43+5:302025-09-19T10:56:30+5:30
The Bads of Bollywood Web Series: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याची पहिली वेबसीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून हटवलं तमन्ना भाटियाचं गाणं 'गफूर'?, निर्माते म्हणाले....
शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा मुलगा आर्यन खान(Aryan Khan)ने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याची पहिली वेबसीरिज 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Bads Of Bollywood Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. आर्यनने बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांच्यासोबत मिळून ही सीरिज लिहिली आहे. यंदाच्या वर्षातील ही एक सर्वाधिक चर्चेत असलेली वेबसीरिज आहे. पण सीरिज रिलीज होताच चाहत्यांना एका गोष्टीची कमी जाणवली, ती म्हणजे तमन्ना भाटिया(Tamannah Bhatia)च्या 'गफूर' गाण्याची, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
खरेतर, 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या प्रमोशन दरम्यान 'गफूर' गाणे दाखवले गेले होते. त्यामुळे चाहते तमन्नाला पुन्हा एकदा आयटम साँगमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. अनेक प्रेक्षकांना अपेक्षा होती की हे गाणे शोच्या सात एपिसोड्समध्ये असेल. पण त्यांची निराशा झाली, कारण हे गाणे संपूर्ण सीरिजमध्ये कुठेच नव्हते. काहींनी तर असाही अंदाज लावला की हे गाणे फायनल एडिटिंगमधून काढून टाकले गेले आहे.
वेबसीरिजचे निर्माते 'रेड चिलीज एण्टरटेनमेंट'ने X अकाउंटवर याबद्दल खुलासा केला आहे. पोस्टमध्ये सांगितले की 'गफूर' हा एक प्रमोशनल व्हिडीओ आहे, जो उद्या रिलीज होईल. तमन्ना भाटियावर चित्रीत केलेले हे गाणे नेहमीच शोमधील ट्रॅक नसून एक वेगळा प्रमोशनल व्हिडीओ म्हणून बनवला गेला होते. मात्र, शोमध्ये गाण्याची एक वेगळी आवृत्ती दाखवली आहे. हे गाणे १५ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होते, पण त्याला उशीर झाला. ते आज, शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रिलीज केले जाणार आहे.
She is ready for Ghafoor, are you?#Ghafoor - Promotional Video Out Tomorrow!
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) September 18, 2025
Music & Lyrics - Shashwat Sachdev
Music Video Director - Farah Khan
Watch The Ba***ds of Bollywood, out now, only on Netflix. #TheBadsOfBollywood#TheBadsOfBollywoodOnNetflix@NetflixIndia… pic.twitter.com/RaFL0miYxq
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ची कास्ट
आर्यन खानच्या या वेब सीरिजमध्ये लक्ष्य, बॉबी देओल, आन्या सिंग, मनोज पाहवा, सहर बाम्बा, राघव जुयाल आणि मोना सिंग हे कलाकार आहेत.