कटपीस ड्रेसमध्ये समंथा रुथ प्रभूची इव्हेंटमध्ये हजेरी, अभिनेत्रीचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:22 IST2025-05-27T11:17:01+5:302025-05-27T11:22:39+5:30

समंथा रुथ प्रभूचा लूक पाहून नेटकरी शॉक, हे काय झालं?

Samantha Ruth Prabhu attended an event in a cut piece dress netizens trolled the actress after seeing her face | कटपीस ड्रेसमध्ये समंथा रुथ प्रभूची इव्हेंटमध्ये हजेरी, अभिनेत्रीचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

कटपीस ड्रेसमध्ये समंथा रुथ प्रभूची इव्हेंटमध्ये हजेरी, अभिनेत्रीचा चेहरा पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आधी घटस्फोट, नंतर आजारपण तर आता अफेअरमुळे ती चर्चेत होती. दरम्यान समंथाने नुकतंच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी तिचा लूक पाहून नेटकरी अवाक झाले. ती अगदीच बारीक दिसत होती आणि तिचा चेहराही फार वेगळा दिसत होता. नेटकऱ्यांनी तिचा लूक अजिबातच पटला नाही आणि यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 

समंथा रुथ प्रभू एका इव्हेंटमध्ये कटपीस ड्रेसमध्ये आली होती. ब्राऊन रंगाच्या या ड्रेसमध्ये तिने आपली कर्वी बॉडी फ्लॉन्ट केली. फॉर्म फिटिंग ड्रेसमध्ये ती स्टनिंग दिसत होती. ड्रेसच्या बाजूच्या भागावर कटआऊट  डिझाईन होती. समंथाने या लूकसोबत मॅचिंग हिल्स, हलका मेकअप कॅरी केला होता. तिचे मोकळे केस सेट केले होते. ती कॅमेऱ्यासमोर पोज देत होती. 

नेटकऱ्यांनी समंथाच्या या लूकवर कमेंट करत लिहिले, "ही दिवसेंदिवस इतकी विचित्र का दिसत आहे','हिने बहुतेक नाकाची सर्जरी केली आहे','हिच्या चेहऱ्याला काय झालं?' असं म्हणत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

समंथा नुकतीच 'सिटाडेल: हनी बनी' सीरिजमध्ये दिसली. आता तीआगामी 'रक्त ब्रम्हांड: द ब्लडी किंग्डम' सीरिजमध्ये दिसणार आहे. तसंच एका साऊथ सिनेमातही तिची भूमिका आहे. तसंच काही दिवसांपासून समंथा आणि दिग्दर्शक राज यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. समंथाने राजसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. राजनेच समंथाची भूमिका असलेल्या 'फॅमिली मॅन २' आणि 'सिटाडेल' सीरिजचं दिग्दर्शन केलं होतं. 

Web Title: Samantha Ruth Prabhu attended an event in a cut piece dress netizens trolled the actress after seeing her face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.