सई ताम्हणकरची नवी वेबसीरिज 'क्राईम बीट', ट्रेलर आला भेटीला; अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:14 IST2025-02-11T17:13:57+5:302025-02-11T17:14:35+5:30
अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) नुकतीच 'द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स' (The Secret Of The Shiledars) या वेबसीरिजमध्ये झळकली. त्यानंतर आता ती आणखी एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचं नाव आहे 'क्राईम बीट' (Crime Beat).

सई ताम्हणकरची नवी वेबसीरिज 'क्राईम बीट', ट्रेलर आला भेटीला; अभिनेत्री म्हणाली...
अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) नुकतीच 'द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स' (The Secret Of The Shiledars) या वेबसीरिजमध्ये झळकली. त्यानंतर आता ती आणखी एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचं नाव आहे 'क्राईम बीट' (Crime Beat). या सीरिजमध्ये एका नवोदित गुन्हेगारी पत्रकाराचा प्रवास दाखविण्यात आला आहे. हे कथानक सोमनाथ बटब्याल यांच्या 'द प्राइस यू पे’ या पुस्तकावर आधारित आहे. कंटेंट फिल्म्स प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडने या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज २१ फेब्रुवारीला झी ५वर भेटीला येणार आहे.
'क्राइम बीट'मध्ये एका नवोदित गुन्हेगारी पत्रकाराचा प्रवास दाखविण्यात आला होता. हा पत्रकार व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर स्वत:ला शोधण्याच्या संघर्षात अडकला आहे. तो एका फरार गुंडाला भारतात परत आणण्याच्या प्रकरणातील धागेदोरे शोधून काढतो. त्याला यश मिळते. पत्रकारिता क्षेत्रात खळबळ निर्माण करण्याची क्षमता असलेल्या तपासात तो बराच खोलपर्यंत जातो. त्याला फसवणूक आणि छुप्या अजेंड्यांच्या धोकादायक जाळ्यात ओढले जाते. तो जितका हा गुंता उलगडण्याचा प्रयत्न करतो, तितकीच त्याची परिस्थिती अधिक धोकादायक बनते. यशासाठी तो सगळा त्याग करेल की सत्य त्याला चिरडून टाकेल? ही मालिका कायद्याची अंमलबजावणी, मीडिया आणि अंडरवर्ल्डच्या गुंतागुंतीचा शोध घेते.
या सीरिजबद्दल सई ताम्हणकर म्हणाली, ''क्राइम बीटमधील माझी व्यक्तिरेखा मी यापूर्वी साकारलेल्या कोणत्याही व्यक्तिरेखेपेक्षा वेगळी आहे. ती धाडसी, महत्त्वाकांक्षी, निर्भय आणि स्वतःमध्ये एक मास्टरमाइंड आहे. मला आव्हान देणाऱ्या आणि मला माझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे नेणाऱ्या भूमिका साकारण्याच्या संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. ज्यामुळे मला अधिक अष्टपैलू आणि प्रायोगिक कलाकार म्हणून बनण्यास मदत होतेय. या पात्राला जिवंत करण्यात मला खरोखर आनंद झाला. मला आशा आहे की प्रेक्षक या मालिकेशी जोडले जातील. क्राइम बीट हा एक प्रकारचा वेगवान, उच्च दर्जाचा ड्रामा आहे जो तुम्हाला तुमच्या आसनाला खिळवून ठेवेल. मला विश्वास आहे की निर्मात्यांनी या मनोरंजक तपास थरारपटासाठी एक हटके काम केले आहे.''