'ताली' वेबसिरीजमधील सुव्रतच्या भूमिकेचं सई ताम्हणकरने केलं कौतुक म्हणाली, 'हा रोल..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 13:33 IST2023-08-18T13:30:42+5:302023-08-18T13:33:27+5:30
सुव्रतने सिरीजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे.

'ताली' वेबसिरीजमधील सुव्रतच्या भूमिकेचं सई ताम्हणकरने केलं कौतुक म्हणाली, 'हा रोल..."
तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत (Gauri Sawant) यांच्या जीवनावर आधारित ताली ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने गौरी सावंतची भूमिका साकारली आहे. तर, या सीरिजमध्ये काही मराठमोळे कलाकारही झळकले आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे सुव्रत जोशी (Suvrat Joshi). सुव्रतने सिरीजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारली आहे. सध्या त्याच्या भूमिकेचं कौतुक होतंय. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही सुव्रतचं कौतुक केलं आहे.
मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'ताली' वेबसिरीजमध्ये सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत आहेच. मात्र अनेक मराठी कलाकारांनीही अभिनयाची छाप सोडली आहे. गौरी सावंतच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री कृतिका देवने साकारली आहे. तिचंही कौतुक होतंय. तर सुव्रत जोशीची भूमिका म्हणजे प्रेक्षकांसाठी सरप्राईजच आहे. त्याचं काम बघून सई ताम्हणकर म्हणाली, 'ही भूमिका निवडण्यासाठी आणि त्याच प्रामाणिकपणे ती उत्तम साकारण्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन.'
आता सईने कौतुक केलं म्हणल्यावर सुव्रतही खुश झाला. त्यानेही प्रतिक्रिया देत लिहिले,'मला नेहमीच तुझं काम प्रचंड आवडतं. तुझ्याकडून या शब्दात कौतुक झालं माझा आजचा दिवस सार्थकी लागला. थँक यू.'
'वारंवार अपमानित झालेले..'; सुव्रतने साकारलेली ट्रान्सजेंडरची भूमिका पाहून भारावली सखी
या सीरिजमध्ये हेमांगी कवी आणि ऐश्वर्या नारकर या मराठी अभिनेत्रीही झळकल्या आहेत. या सीरिजचे एकूण ६ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड साधारणपणे ३० मिनिटांचा आहे. त्यामुळे संपूर्ण सीरिजचा विचार केला तर ही सीरिज ३ तासांची आहे.