'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:26 PM2024-06-21T12:26:46+5:302024-06-21T12:27:08+5:30

प्रेग्नंट रिचा चड्डाने पतीची केली चेष्टा

Richa Chadha s funny comment on Mirzapur 3 trailer after seeing husband Ali Fazal s look | 'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

'मिर्झापूर 3'च्या ट्रेलरवर रिचा चड्डाची मजेशीर कमेंट, पती अली फजलचा लूक बघून म्हणाली...

ओटीटीवरील सर्वात चर्चेतली वेबसीरिज 'मिर्झापूर 3' (Mirzapur 3) चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या यांच्यात फेस ऑफ पाहायला मिळणार आहे. मिर्झापूरच्या गादीसाठी त्यांच्यात युद्ध असेल. तसंच कालीन भैय्या मुन्ना भैय्याच्या हत्येचा बदला घेतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान ट्रेलरमधून गुड्डू भैय्याचा सनकी अॅटिट्यूड चांगलाच व्हायरल होतोय. अली फजलच्या (Ali Fazal) पत्नीची रिचा चड्डाची (Richa Chadha)  यावर मजेशीर प्रतिक्रिया आली आहे.

रिचा चड्डानेसोशल मीडियावर 'मिर्झापूर 3'चा ट्रेलर शेअर केला. रिचाने अली फजलची चेष्टा करत लिहिले, "तर आज ट्रेलर आलाच, हो ना गुड्डू? आता आपल्या बाळाला समजेल की लग्नात तुझे केस छोटे का होते आणि आता असा स्पोर्टी लूक का आहे? मी बघू शकेन का? तू यामध्ये नक्कीच अविश्वसनीय असशील. तू घेतलेल्या मेहनतीची मी साक्षीदार आहे."

रिचा चड्डा सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. काही महिन्यात ती पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच रिचाची 'हीरामंडी' सीरिज प्रदर्शित झाली. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

'मिर्झापूर 3' येत्या 5 जुलै रोजी रिलीज होत आहे. अली फजल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, अंजुम शर्मा सह कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Richa Chadha s funny comment on Mirzapur 3 trailer after seeing husband Ali Fazal s look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.