बाबा निरालाच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेणार पम्मी, 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:55 IST2025-02-12T16:54:47+5:302025-02-12T16:55:32+5:30
Aashram 3 Part 2 Teaser: बॉबी देओलची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज झाला आहे. पम्मी बाबा निरालाकडून प्रत्येक अत्याचाराचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे.

बाबा निरालाच्या प्रत्येक अत्याचाराचा बदला घेणार पम्मी, 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज
प्रेक्षक 'आश्रम ३'च्या भाग २ (Aashram 3 Part 2 Teaser)ची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण 'आश्रम २ पार्ट २' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. याआधी या सीरिजची झलक दाखवत निर्मात्यांनी 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज केला आहे. पम्मी बाबा निराला यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे.
टीझरची सुरुवात बाबा निराला यांच्या भक्तांच्या गर्दीने होते. यानंतर पम्मी वधू बनताना दाखवण्यात आली आहे. तिची वहिनी बबिताच तिला वधू बनवताना दिसतेय. दुसरीकडे, पम्मी आणि भोपा यांच्यात एक वेगळी केमिस्ट्री आहे, जे पम्मीची बाबा निरालाला धडा शिकवण्यासाठी लढवलेली युक्ती आहे असे दिसते. अत्याचार आणि सूडाची कहाणी दाखवणाऱ्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवली आहे.
'आश्रम ३ पार्ट २' कुठे पाहू शकता?
'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर शेअर करताना बॉबी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, भक्तांची प्रतीक्षा लवकरच संपेल. #एक बदनाम आश्रम सीझन ३ पार्ट २ लवकरच Amazon MX Player वर येत आहे. सध्या निर्मात्यांनी सीरिजच्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.
'आश्रम ३ पार्ट २'ची स्टारकास्ट
'आश्रम ३ पार्ट २'चे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे तीन भाग रिलीज झाले आहेत ज्यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा ही क्राईम-थ्रिलर मालिका तिचा पुढचा भाग घेऊन परतत आहे. 'आश्रम ३ पार्ट २'मध्ये बॉबी देओलसोबत आदिती पोहणकर, चंदन रॉय सन्याल, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, विक्रम कोचर, अनुप्रिया गोएंका, राजीव सिद्धार्थ आणि ईशा गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.