अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 11:05 IST2025-05-14T11:04:13+5:302025-05-14T11:05:29+5:30

Neil Nitin Mukesh angry at Anushka Sen: सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी नील नितीन मुकेश आणि अनुष्का सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Neil Nitin Mukesh angry with Anushka Sen hai junoon series event video viral | अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल

अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल

Neil Nitin Mukesh angry at Anushka Sen: अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) बऱ्याच काळानंतर स्क्रीनवर कमबॅक करत आहे. 'है जुनून' सीरिजमधून तो ओटीटीविश्वात पदार्पण करत आहे. हा युथ सेंट्रिक म्युझिक ड्रामा असणार आहे. जॅकलीन फर्नांडिसही यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसंच अनुष्का सेन, सिद्धार्थ निगम ही तरुण मंडळीही आहेत. सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटवेळी नील नितीन मुकेश आणि अनुष्का सेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये नील अनुष्कावर चिडलेला दिसतोय.

मुंबईत काल 'है जुनून' या म्युझिकल सीरिजच्या प्रमोशनसंबंधी एक इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. नील नितीन मुकेश, अनुष्का सेन, सिद्धार्थ निगम आणि इतर कलाकारांनी या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. ग्रे सूटमध्ये नील हँडसम दिसत होता. तर लाल रंगाचा गाऊन आणि सुंदर हेअरस्टाईलमध्ये ती क्युट दिसत होती. दरम्यान नील अनुष्काकडे बोट दाखवून तिच्यावर रागवल्यासारखं बोलत होता. तर अनुष्का थोडी घाबरलेली दिसत होती. नील अनुष्काला रागवत असल्यासारखंच व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


नक्की काय झालं होतं आणि नील का चिडलेला होता हे अद्याप समोर आलेलं नाही. अनुष्का सेन केवळ २२ वर्षांची असून तिने खूप कमी वयात इतकं यश, प्रसिद्धी मिळवली आहे. 'है जुनून' सीरिजमध्ये तिला बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसंच नीलच्या कमबॅककडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. १६ मे रोजी सीरिज जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

Web Title: Neil Nitin Mukesh angry with Anushka Sen hai junoon series event video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.