'त्या' एका घटनेमुळे प्राजक्ताने सोडली होती रानबाजार; पहिल्यांदाच केला त्यामागचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:12 AM2023-09-14T11:12:33+5:302023-09-14T11:13:04+5:30

Prajakta mali: प्राजक्ताने रानबाजार या सीरिजविषयी एक खुलासा केला आहे.

marathi-actress-prajakta-mali-talks-about-raanbaazaar-role-amruta-khanvilkar-advice-her-to-not-to-leave-this-series | 'त्या' एका घटनेमुळे प्राजक्ताने सोडली होती रानबाजार; पहिल्यांदाच केला त्यामागचा खुलासा

'त्या' एका घटनेमुळे प्राजक्ताने सोडली होती रानबाजार; पहिल्यांदाच केला त्यामागचा खुलासा

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी( prajakta mali). आजवर प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमामध्ये काम केलं आहे. परंतु, रानबाजार या वेबसीरिजमधील तिची भूमिका सर्वाधिक चर्चिली गेली. या सीरिजमध्ये तिने पहिल्यांदाच इतकी बोल्ड भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेमुळे काहींनी तिचं कौतुक केलं. तर, काहींना मात्र तिला कमालीचं ट्रोल केलं. यामध्येच आता प्राजक्ताने या सीरिजविषयी एक खुलासा केला आहे. सुरुवातीला काही भागांचं शूट केल्यानंतर तिने ही सीरिज सोडली होती. त्यामागच कारण तिने नुकतंच एका मुलाखतीत दिलं आहे.

रानबाजार या सीरिजचा टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. साध्या,सालस भूमिका साकारणारी प्राजक्ता एकदम बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली. त्यामुळे सगळेच जण थक्क झाले होते.  परंतु, ही भूमिका करण्यासाठी प्रथम प्राजक्ताने नकार दिला होता.

बस्स झालं...आता कोणाचाही, कसलाच विचार करायचा नाही, असं म्हणून आपण एखादा निर्णय घेतला, असा कोणता क्षण तुझ्या आयुष्यात आलाय का? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. त्यावर तिने रानबाजारचं उदाहरण दिलं.

काय म्हणाली प्राजक्ता?

"कोणत्याही प्रोजेक्ट निवडताना आपण विचार करतो की आपली इमेज काय आहे. प्रेक्षकांना कसं वाटेल? ते कशी प्रतिक्रिया देतील. रानबाजारच्या वेळी मी यातून गेले होते. मला स्क्रिप्ट प्रचंड आवडलेली. ती एका सेक्स वर्करची भूमिका होती. पूर्ण सीरिजमध्ये काही नव्हतं. पण, टीझर  कसा असला पाहिजे हे त्यांच्या डोक्यात अधीच ठरलेलं होतं. त्यामुळे टीझर असा असणारच आहे. ट्रोलिंग होणारच आहे हे माहित होतं. त्यामुळे ही सीरिज करायची की नाही हा खूप गोंधळ होता.", असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते," खरं तर मी रानबाजार ही सीरिज सोडली होती. एक नरेशन तर मी नसतानाच झालं ही होतं. पण मग अमृता खानविलकरने मला खूप शिव्या घातल्या. तू वेडी आहेस का? अभिजीत पानसेंसोबत काम करायला मिळतंय, तू काय करतेस? असं तिने विचारलं. त्यानंतर प्रसाद ओकने सुद्धा मला सुनावलं. काय विचार वगैरे करू नको, करून टाक", असं ते म्हणाले.

दुसऱ्या एका मुलाखतीत प्राजक्ताला या भूमिकेवर आईची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती तेव्हा ती म्हणाली होती की, 'माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. मी तिची परवानगी घेऊनच हे काम केलं आहे. माझी आई पुढारलेल्या विचारांची आहे. त्यामुळे कलाकार प्राजक्ता आणि माणूस म्हणून प्राजक्ता कशी आहे, याची तिला व्यवस्थित माहिती आहे. कलाकार प्राजक्ताला तिनं कायमच पाठिंबा दिला आहे.
 

Web Title: marathi-actress-prajakta-mali-talks-about-raanbaazaar-role-amruta-khanvilkar-advice-her-to-not-to-leave-this-series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.