मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार वेबसीरिज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:25 IST2025-06-24T16:21:58+5:302025-06-24T16:25:22+5:30
'द फॅमिली मॅन ३'ची सर्वांना उत्सुकता आहे. या सीरिजचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून आज अधिकृत घोषणा झाली आहे

मनोज वाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा, कधी रिलीज होणार वेबसीरिज?
आज प्राईम व्हिडीओवर 'पंचायत ४' सीरिज रिलीज झाली आहे. अशातच प्राईम व्हिडीओने प्रेक्षकांना आणखी एक गुड न्यूज दिली आहे. 'पंचायत ४'नंतर आता प्राईम व्हिडीओने त्यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'द फॅमिली मॅन'च्या पुढील सीझनची अर्थात 'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा झाली आहे. मनोज वाजपेयींची प्रमुख भूमिका असलेल्या 'द फॅमिली मॅन ३'चं पोस्ट रिलीज झालं आहे. जाणून घ्या या वेबसीरिजबद्दल
'द फॅमिली मॅन ३'ची अधिकृत घोषणा
'द फॅमिली मॅन ३'चं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये मनोज वाजपेयी दिसत आहे. या पोस्टरच्या खाली कमिंग सून असं लिहिण्यात आलं आहे. म्हणजेच 'द फॅमिली मॅन ३'ची रिलीज डेट अजून समोर आली नाहीये. परंतु पहिलं पोस्टर आज रिलीज झाल्याने पुढील काही महिन्यांमध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. २०१९ मध्ये 'द फॅमिली मॅन' वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तर शारीब हाश्मी हा त्याचा सहकारी दाखवण्यात आला आहे. या सीरिजचा दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.
आता 'द फॅमिली मॅन ३'मध्ये जयदीप अहलावतने कास्टला जॉईन केलं आहे. आता 'द फॅमिली मॅन ३'मध्ये मनोज वाजपेयी, प्रियामणी, जयदीप अहलावत यांच्यासोबत अजून कोणते कलाकार झळकणार,याकडे सर्वांचं लक्ष आहे. याशिवाय या सीरिजमध्ये खलनायक म्हणून कोण असणार, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. आधीच्या दोन्ही सीझनप्रमाणे राज आणि डीके या दिग्दर्शक जोडीने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे