बॉलिवूड वाईव्ह्जना बोलता येईना शुबमन गिलचं नाव; महीप कपूर म्हणते, 'शबनम...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 15:33 IST2024-10-21T15:30:08+5:302024-10-21T15:33:28+5:30

'शुभम तुझ्यापेक्षा २० वर्षांनी तरी लहान आहे...', शुभमन गिलच्या नावात केली गडबड

Maheep kapoor and other from fabulous lives of bollywood wives mispronounce shubhman gill | बॉलिवूड वाईव्ह्जना बोलता येईना शुबमन गिलचं नाव; महीप कपूर म्हणते, 'शबनम...'

बॉलिवूड वाईव्ह्जना बोलता येईना शुबमन गिलचं नाव; महीप कपूर म्हणते, 'शबनम...'

'फॅब्युलस लाईव्ह्ज बॉलिवूड वाईव्ह्ज' (Fabulous Lives of Bollywood Wives) ही नेटफ्लिक्सवरील चर्चेतली सीरिज. याचा एक व्हिडिओ  सध्या व्हायरल होतोय. ज्यामध्ये संजय कपूरचूी पत्नी महीप कपूर, चंकी पांडेची पत्नी भावना पांडे यांना भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलचं नावच नीट घेता येत नाहीये. कधी 'शुभनम', 'शुभम' तर कधी 'शबनम' अशी नावं ते घेताना दिसत आहेत. 

नेटफ्लिक्सवर नुकतीच सीरिजची एक झलक दाखवण्यात आली. यात भावना पांडे म्हणते,  "बॉलिवूड आणि क्रिकेटर्स सुद्धा असणार आहेत. नीलम विचारते, 'धोनी येतोय?' भावना म्हणतो,'रोहित शर्मा येऊ शकतो?' नीलम म्हणते, 'शुभमचं काय?' भावना म्हणते,'शुभम तुझ्यापेक्षा २० वर्षांनी तरी लहान आहे.' यानंतर सगळेच हसतात. नंतर कोणी 'शुभनम', 'शुभम', 'शबनम' अशी नावं घेतात. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.


नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून यांची खिल्लीच उडवली आहे. '५० वर्षांच्या महिला असंच तरुणांना क्युट क्युट म्हणतात का'अशी कमेंट एकाने केली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. हा सीरिजचा तिसरा सीझन आहे  सीरिजमध्ये महीप कपूर, भावना पांडे, नीलम कोठारी, सीमा सजदेह, रिद्धीमा कपूर साहनी, शालिनी पासी आणि कल्याणी साहा चावला यांच्या भूमिका आहेत.

Web Title: Maheep kapoor and other from fabulous lives of bollywood wives mispronounce shubhman gill