'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:56 IST2025-08-23T13:50:56+5:302025-08-23T13:56:31+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत शेअर करणार स्क्रिन, कधी होणार प्रदर्शित?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याला लागली लॉटरी; मनोज वाजपेयींसोबत झळकणार, पोस्टर आलं समोर
Inspector Zende Webseries : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. या लोकप्रिय शोमधील कलाकार मोठा पडदा देखील गाजवत आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये झळकणारा एक लोकप्रिय अभिनेत्याची हिंदी वेबसीरिजमध्ये वर्णी लागली आहे. 'इन्स्पेक्टर झेंडे' असं या सीरिजचं नाव आहे.
सत्य घटनेवर आधारित ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या बहुचर्चित सीरिजमध्ये लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयी ‘इन्स्पेक्टर मधुकर झेंडे’ यांची भूमिका साकारत असून, जिम सरभ ‘स्विमसूट किलर’ कार्ल भोजराज या हुशार चोराची भूमिका निभावत आहे. दरम्यान, नुकतंच या सीरिजचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. त्यामध्ये अभिनेते भालचंद्र कदम, गिरीजा ओक आणि हरीश दूधाडे हे मराठी कलाकार दिसत आहे. याशिवाय आणखी एक लोकप्रिय चेहरा या पोस्टरवर पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजे हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आहे.
दरम्यान, या वेब सीरिजमध्ये ओंकार कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. ‘इन्स्पेक्टर झेंडे’ही नेटफ्लिक्सवर येत्या ५ सप्टेंबरपासून पाहाता येणार आहे. वेगवेगळे चित्रपट, मालिकांमधून झळकलेला ओंकार आता नव्या सीरिजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.