धाडसी विषय, मन सुन्न करणारी कथा! ‘तेरे इश्क मे’ अन् ‘धुरंधर’ला 'या' सिनेमाने दिली मात, OTTवर आहे ट्रेंडिग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:17 IST2026-03-11T16:09:37+5:302026-03-11T16:17:55+5:30

हल्लीच्या काळात सायकोलॉजिकल, थ्रिलर,रहस्यमय आणि अॅक्शनपट अशा धाटणीच्या कथानकांची डिमांड दिवसेंदिवस वाढली आहे.मात्र, या सगळ्यात सायकलॉजिकल सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील वाढत चालला आहे.

konkona sen sharma and pratibha ranta starring accused psychological thriller drama trending on netflix | धाडसी विषय, मन सुन्न करणारी कथा! ‘तेरे इश्क मे’ अन् ‘धुरंधर’ला 'या' सिनेमाने दिली मात, OTTवर आहे ट्रेंडिग 

धाडसी विषय, मन सुन्न करणारी कथा! ‘तेरे इश्क मे’ अन् ‘धुरंधर’ला 'या' सिनेमाने दिली मात, OTTवर आहे ट्रेंडिग 

OTT Movies : ओटीटीवर दर आठवड्याला नवनवे वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्यात  हल्लीच्या काळात सायकोलॉजिकल, थ्रिलर,रहस्यमय आणि अॅक्शनपट अशा धाटणीच्या कथानकांची डिमांड दिवसेंदिवस वाढली आहे.मात्र, या सगळ्यात सायकलॉजिकल सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग देखील वाढत चालला आहे. असाच एक चित्रपट अलिकडेच २७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ओटीटीवर ट्रेडिंग चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवून धुमाकूळ घातलाय.

ॲक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधतात. मात्र, ओटीटीवर प्रदर्शित होताच या सायकोलॉजीकल-थ्रिलर चित्रपटाने अनेकांचं लक्ष वेधलं. हा चित्रपट म्हणजे अक्युज्ड आहे. कोंकणा सेन शर्मा आणि  लापता लेडीज फेम प्रतिभा रांटा यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच या सिनेमाने टॉप-१० सिनेमांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे ‘अक्युज्ड’ या चित्रपटाने ‘तेरे इश्क मे’ आणि ‘धुरंधर’यांसारख्या लोकप्रिय आणि हिट ठरलेल्या चित्रपटांनाही मागे सोडत नेटफ्लिक्सवरील नंबर वन ट्रेडिंग फिल्म बनली आहे.

अनुभूती कश्यपने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात दोन महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यात कोंकणा सेन शर्मा हिने यामध्ये गीतिका हे पात्र साकारलं आहे, तर अभिनेत्री प्रतिभा रांटा हिने मीरा हे पात्र साकारलं आहे. मीरा व गितीका दोघी लेसबियन असून त्यांचं लग्न झालेलं असतं आणि त्या सुखी वैवाहिक जीवन जगत असतात. मात्र, त्यानंतर एका निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. 

गीतिका  तिच्या पतीच्या संमतीने एक बाळ दत्तक घेणार असते. पण, त्याच दिवशी तिच्यावर लैंगिक छळाचा आरोप होतो. यानंतर घडणाऱ्या घडामोडी लक्ष वेधणाऱ्या आहेत. लेस्बियन कपलची ही धाडसी कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. 

Web Title: konkona sen sharma and pratibha ranta starring accused psychological thriller drama trending on netflix