'लस्ट स्टोरीज'नंतर करण जोहरची Love Storiyaan! व्हॅलेंटाइनला प्रदर्शित होणार सीरिज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:48 IST2024-02-06T13:58:29+5:302024-02-06T14:48:10+5:30
Love Storiyaan : सच्ची मोहोब्बत की सच्ची कहानिया! Valentine ला करण जोहर ओटीटीवर घालणार धुमाकूळ

'लस्ट स्टोरीज'नंतर करण जोहरची Love Storiyaan! व्हॅलेंटाइनला प्रदर्शित होणार सीरिज
करण जोहर हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना', 'ए दिल है मुश्किल' अशा सुपरहिट सिनेमांतून करणने प्रत्येक वेळी प्रेमाची नवी परिभाषा चाहत्यांसमोर मांडली. 'कलंक'पासून ते 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'पर्यंत वेगळी प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता व्हॅलेंटाइन्स डेसाठी करणने चाहत्यांसाठी खास सरप्राइज आणलं आहे.
व्हॅलेंटाइन स्पेशल करणने 'लव्ह स्टोरिया' या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरुन याचं पोस्टर करणने शेअर केलं आहे. या सीरिजमधून रिअल लाइफ लव्हस्टोरी करण प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. लव्ह स्टोरियाचं पोस्टर शेअर करत करणने "सच्ची मोहोब्बत की सच्ची कहानियां...संपूर्ण भारतातून तुमच्यापर्यंत येत आहे..." असं कॅप्शन दिलं आहे.
करणच्या या नव्या वेब सीरिजसाठी चाहतेही उत्सुक आहेत. त्याच्या या पोस्टरवर कमेंट करत चाहत्यांनी प्रतीक्षा करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सध्या करण जोहर अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. त्याच्या आगामी 'मेरे महबूब मेरे सनम' आणि 'योद्धा' या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. याबरोबरच त्याच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'जिगरा' या सिनेमांचंही शूटिंग सुरू आहे.