देशभरात चर्चेत आलेल्या 'निळा ड्रम' केसवर आली वेबसीरिज, मुस्कानसारख्याच ५ थरारक हत्याकांडांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:46 IST2026-01-09T12:45:24+5:302026-01-09T12:46:27+5:30
सोनम केस असो किंवा मुस्कानची केस असो, गेलं वर्ष अशाच केसेसमुळे चर्चेत होतं.

देशभरात चर्चेत आलेल्या 'निळा ड्रम' केसवर आली वेबसीरिज, मुस्कानसारख्याच ५ थरारक हत्याकांडांचा समावेश
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका हत्याकांडाने अख्खा देश हादरला होता. मुस्कान रस्तोगीने पती सौरभची हत्या करुन त्याला निळ्या ड्रममध्ये पुरलं होतं. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. याआधी सोनम आणि राजची केसही अशीच अंगावर काटा आणणारी होती. कोणी इतकं क्रूर कसं असू शकेल अशा प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त झाल्या. आता याच केसवर वेबसीरिज आली आहे. यामध्ये सोनम आणि राजच्या केसचाही समावेश आहे.
सोनम केस असो किंवा मुस्कानची केस असो, गेलं वर्ष अशाच केसेसमुळे चर्चेत होतं. यावर सोशल मीडियावर नंतर अनेक मीम्सही बनले होते. लोकांचा तर अगदी लग्नावरुनच विश्वास उडाला. दरम्यान या केसेसवर आज वेबसीरिज आली आहे. झी५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज उपलब्ध आहे. 'हनीमून से हत्या' असं सीरिजचं नाव आहे. यामध्ये अंगावर काटा आणणाऱ्या ५ केसेस आहेत ज्यांनी संपूर्ण देश हादरला होता. सोनम-राजा रघुवंशी केस, मेरठ ब्लू ड्रम केस, भिवानी इन्फ्लुएन्सर केस, मुंबई टाइल केस आणि दिल्ली इलेक्ट्रिक शॉक केस यांचा समावेश आहे. कशाप्रकारे महिलांनी बॉयफ्रेंडच्या मदतीने आपल्याच पतीचा निर्घृण खून केला होता. सीरिजमध्ये महिलांच्या मानसिकतेवर फोकस करण्यात आलं आहे.
अजितेश शर्मा यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी सनसनी न दाखवता सीरिजला रिअल ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पोलिस अधिकारी आणि कुटुंबांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या आहेत. ही सीरिज कम डॉक्युमेंटरी आहे. काही रिअल फुटेजही आहेत. तसंच सीरिज फक्त क्राइम दाखवत नाही तर घटनेनंतर कुटुंबावर काय परिणाम होतो याचंही चित्रण दाखवते.