"भन्साळींनी दारुचा ग्लास धरायला सांगितला आणि..."; 'हीरामंडी' फेम ७४ वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: March 19, 2025 11:19 IST2025-03-19T11:19:05+5:302025-03-19T11:19:36+5:30

हीरामंडी वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी शूटिंगचा खास अनुभव शेअर केलाय (heeramandi)

heeramandi fame actress farida jalal recall experience shooting with alcohol and cigarettes | "भन्साळींनी दारुचा ग्लास धरायला सांगितला आणि..."; 'हीरामंडी' फेम ७४ वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

"भन्साळींनी दारुचा ग्लास धरायला सांगितला आणि..."; 'हीरामंडी' फेम ७४ वर्षीय अभिनेत्रीने सांगितला अनुभव

संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) दिग्दर्शित 'हीरामंडी' (heeramandi) वेबसीरिजची चांगली चर्चा झाली. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होताच विषय, आशय, कलाकारांचा अभिनय अशा सर्वच गोष्टींचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. अशातच 'हीरामंडी' वेबसीरिजमध्येकुदसिया बेगमच्या भूमिकेत झळकलेल्या ७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांनी शूटिंगचा सुन्न करणारा अनुभव सांगितला. जेव्हा दिग्दर्शक भन्साळींनी फरीदा यांना एका सीनसाठी दारुचा ग्लास आणि सिगरेट धरायला सांगितल्यावर अभिनेत्रीला काय वाटलं, याविषयी त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.

फरीदा जलाल यांनी सांगितला अनुभव

'हीरामंडी'  वेबसीरिजमध्ये काम करणाऱ्या फरीदा जलाल यांनी गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "वेबसीरिजमध्ये मला नवाबांच्या एका ग्रुपसोबत बसायचं होतं. माझा मुलगा परदेशातून पुन्हा भारतात येतो आणि एका शानदार पार्टीचं आयोजन केलं असतं. त्यावेळी माझ्या एका हातात दारुचा ग्लास आणि दुसऱ्या हातात सिगरेट असेल, असं मला सांगण्यात आलं होतं. हे ऐकताच मी सुन्न झाले." 

"मी भन्साळींना म्हणाले की, सर मी याआधी कधीही असं केलं नाही. माझ्या जीवनात अशा अनेक संधी आल्या परंतु असे सीन्स करायला मी कायम नकार दिला. जर मी सिगरेट पकडली असती तर ते खोटं दिसलं असतं. भन्साळींनी हे ऐकल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या म्हणण्याला मान दिला. हातात दारु, सिगरेट धरुन हा सीन करायला मी अस्वस्थ आहे हे त्यांनी ओळखलं. भन्साली खूप महान व्यक्ती आहेत."

"जर माझ्या व्यक्तिरेखेने धुम्रपान आणि मद्यपान केलं असतं तर हीरामंडीच्या बाकीच्या व्यक्तिरेखा आणि माझ्यामध्ये काहीच फरक दिसला नसता. त्यामुळे जेव्हा वेबसीरिजमध्ये मी स्वतःला पाहिलं तेव्हा मला आनंद झाला. मला खात्री आहे की, भन्साळींनाही असंच वाटलं असणार." अशाप्रकारे फरीदा जलाल यांनी हीरामंडीच्या शूटिंगवेळेस त्यांना आलेला अनुभव शेअर केला.

 

Web Title: heeramandi fame actress farida jalal recall experience shooting with alcohol and cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.