"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:58 IST2025-10-27T17:58:22+5:302025-10-27T17:58:49+5:30
"अख्खा बॉलिवूड एक तरफ और...", अखेर इम्रान हाश्मीने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील कॅमिओवर दिली प्रतिक्रिया

"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिज सुपरहिट झाली. या सीरिजची सगळीकडे जोरदार चर्चा झाली. सीरिजचा क्लायमॅक्स तर प्रचंड अनपेक्षित असा होता. तसंच शाहरुख, सलमान, आमिर, राजामौली असे अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी कॅमिओही केले. मात्र या सगळ्यात सर्वात गाजलेला कॅमिओ ठरला तो म्हणजे इम्रान हाश्मीचा. 'अख्खा बॉलिवूड एक तरफ और इम्रान हाश्मी एक तरफ' हा राघव जुयालचा सीरिजमधला डायलॉगही प्रचंड व्हायरल झाला. या अद्भूत प्रतिसादानंतर आता अखेर इम्रान हाश्मीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
इम्रान हाश्मी नुकतंच माध्यमांशी बोलताना हसत म्हणाला, "माझी आर्यन आणि रेड चिलीजसोबत चर्चा झाली होती. सीन व्हायरल होईल हे आम्हाला माहित होतं पण अशा प्रकारे प्रतिसाद मिळेल असा विचार केला नव्हता. मला वाटतं यातून बरंच काही शिकण्यासारखं होतं."
तसंच 'सीरियल किसर'या इमेजवर तो म्हणाला, "मला वाटतं याआधी चाहते नाव घेऊन मला हाक मारायचे किंवा एक दुसरी माझी इमेज होती जी s पासून सुरु होते. मी नाव घेणार नाही नाहीतर रात्रभर हेच चालत राहील. पण आता त्या डायलॉगचा उल्लेख होतो त्यामुळे माझी काहीच तक्रार नाही."
अखेर इम्रान हाश्मीला केवळ त्या इमेजमुळे नाही तर आता सीरिजमधील डायलॉगमुळेही ओळखलं जाऊ लागलं आहे याचा त्याला आनंद आहे. इम्रानचा लवकरच 'हक' हा सिनेमा येणार आहे. यामध्ये त्याची यामी गौतमसोबत जोडी आहे. शाह बानो केसवर हा कोर्टरुम ड्रामा आधारित आहे. ७ नोव्हेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.