Emily in Paris च्या पाचव्या सीझनची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:18 IST2025-12-17T13:16:53+5:302025-12-17T13:18:19+5:30
ही सीरिज प्रामुख्याने इंग्रजी आणि इतर काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे

Emily in Paris च्या पाचव्या सीझनची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर पाहता येणार
Emily In Paris Season 5: जगभरातील फॅशन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय वेबसीरिज 'एमिली इन पॅरिस' (Emily in Paris) आपल्या पाचव्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे, नेहमीप्रमाणे या सीझनचे सर्व दहा भाग नेटफ्लिक्सवर एकाच वेळी प्रदर्शित केले जाणार आहेत.
'एमिली इन पॅरिस'चा पाचवा सीझन येत्या १८ डिसेंबर २०२५ रोजी भारतात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत या सीरिजचे ४ सीझन्स प्रदर्शित झाले आहेत. आता चाहते पाचव्या सीझनसाठी उत्सुक आहेत. सीझन ४ जिथे संपला होता, तिथूनच पुढे एमिली कूपरची कथा सुरू होईल. ही सीरिज प्रामुख्याने इंग्रजी आणि इतर काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे
एमिली इन पॅरिसच्या पाचव्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार?
आतापर्यंत चार सीझनमध्ये पाहायला मिळालं की एमिली कूपर नावाची एक अमेरिकन तरुणी मार्केटिंगच्या कामासाठी शिकागोवरून पॅरिसला जाते. तिथे तिला फ्रेंच संस्कृती, नवीन भाषा आणि प्रेमात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. चौथ्या सीझनच्या शेवटी ती एका वळवणावर उभी होती. तिच्यावर रोमममध्ये काम करण्याची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली होती. या पाचव्या सीझनमध्ये एमिली पॅरिस सोडून रोममध्ये स्थायिक झालेली दिसेल. ती तिथे 'एजेंस ग्रॅटो'च्या नवीन कार्यालयाची जबाबदारी सांभाळणार आहे. जरी एमिली रोममध्ये असली, तरी ही सीरिज पॅरिसशी जोडलेलीच राहील. निर्मात्यांच्या मते, हा सीझन पॅरिस आणि रोम या दोन शहरांमधील एमिलीच्या जीवनाचा समतोल दाखवणारा असेल.