चहलसोबत घटस्फोट आता धनश्री वर्मा थेट रिएलिटी शोमध्ये, म्हणाली- "विश्वासघात तर खूप आधीच झालेला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:56 IST2025-08-26T12:56:05+5:302025-08-26T12:56:29+5:30

चहलशी घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माच्या एका वक्तव्याची चर्चा होते आहे. खरं तर धनश्रीने चहलसोबतच्या घटस्फोटानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. धनश्री लवकरच एका नव्या रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. 

dhanashree verma new reality show after divorce with yuzvendra chahal | चहलसोबत घटस्फोट आता धनश्री वर्मा थेट रिएलिटी शोमध्ये, म्हणाली- "विश्वासघात तर खूप आधीच झालेला..."

चहलसोबत घटस्फोट आता धनश्री वर्मा थेट रिएलिटी शोमध्ये, म्हणाली- "विश्वासघात तर खूप आधीच झालेला..."

भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नानंतर ४-५ वर्षांतच चहल आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. चहलशी घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री वर्माच्या एका वक्तव्याची चर्चा होते आहे. खरं तर धनश्रीने चहलसोबतच्या घटस्फोटानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. धनश्री लवकरच एका नव्या रिएलिटी शोमध्ये दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. 

'राइज अँड फॉल' असं या रिएलिटी शोचं नाव असून या शोमध्ये धनश्री स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. या शोचं सूत्रसंचालन प्रसिद्ध उद्योजक आणि शार्क टँक फेम अश्नीर ग्रोव्हर करणार आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये काही सेलिब्रिटी दिसत आहेत. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना रुलर्स आणि वर्कर्स म्हणून हा खेळ खेळावा लागणार आहे. जे स्पर्धक रुलर्स असतील त्यांना ऐशोआरामात सगळ्या सोयी सुविधा मिळणार आहेत. तर वर्कर्सला काम करावी लागणार आहेत. 


एमएक्स प्लेयरवर 'राइज अँड फॉल' हा शो रिलीज केला जाणार आहे. या शोच्या प्रोमोमध्ये अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा, किकू शारदा आणि कुब्रा सैट यांची झलक पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये किकू म्हणतो की "आपण एकत्र खेळलो तरच जिंकू, विश्वास ठेवा". त्यावर धनश्री म्हणते "विश्वास?? माझा तर खूप आधीच विश्वासघात झालाय?". धनश्रीच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, या शोमध्ये १६ सेलिब्रिटी दिसणार आहेत. 

Web Title: dhanashree verma new reality show after divorce with yuzvendra chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.