सुश्मिता सेनची ‘ताली’ पाहिल्यानंतर चारू असोपा भारावली, म्हणाली, “दीदी तुम्ही...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 18:42 IST2023-08-17T18:42:23+5:302023-08-17T18:42:42+5:30

Taali : 'ताली' वेब सीरिज पाहिल्यानंतर चारू असोपाची सुश्मिता सेनसाठी खास पोस्ट

charu asopa shared special post after watching sushmita sen taali web series | सुश्मिता सेनची ‘ताली’ पाहिल्यानंतर चारू असोपा भारावली, म्हणाली, “दीदी तुम्ही...”

सुश्मिता सेनची ‘ताली’ पाहिल्यानंतर चारू असोपा भारावली, म्हणाली, “दीदी तुम्ही...”

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या ‘ताली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तृतीयपंथियांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये सुश्मिताने तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुश्मिताची पूर्वाश्रमीची वहिनी चारू असोपानेही ‘ताली’ वेब सीरिज पाहिली. वेब सीरिज पाहिल्यानंतर चारू असोपाने सुश्मितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

‘ताली’ वेब सीरिजमधील सुश्मिता सेनचं काम पाहून चारू असोपा भारावून गेली आहे. चारू असोपाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ताली वेब सीरिजमधील काही सीन्सचे फोटो शेअर केले आहेत. ही स्टोरी पोस्ट करत तिने सुश्मिताचं कौतुक केलं आहे. “मस्त काम केलं आहे दीदी...तुमच्यावर गर्व आहे...अंगावर काटा आला”, असं चारू असोपाने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

‘व्हॉट झुमका’ गाण्याच्या संगीतकारांना आशा भोसलेंनी सुनावलं, म्हणाल्या, “जुन्या गाण्यांचे रिमेक...”

चारू असोपाने २०१९मध्ये सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, लग्नाच्या चारच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. चारू असोपा आणि राजीव सेन त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत होते. त्यांना झियाना ही मुलगी आहे.

“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

दरम्यान, ‘ताली’ ही वेब सीरिज १५ ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. रवी जाधव यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं असून क्षितिज पटवर्धनने लेखनाची बाजू सांभाळली आहे. या सीरिजमध्ये अनेक मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुव्रत जोशी, हेमांगी कवी, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर हे कलाकार झळकले आहेत.

Web Title: charu asopa shared special post after watching sushmita sen taali web series