Bigg Boss 19 च्या घरात तूफान राडा, 'हे' २ सदस्य संपूर्ण सीझनसाठी झाले नॉमिनेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:00 IST2025-09-15T14:00:07+5:302025-09-15T14:00:30+5:30
Bigg Boss 19 च्या घरातील दोन सदस्यांना बिग बॉसने थेट संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे, ज्यामुळे सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

Bigg Boss 19 च्या घरात तूफान राडा, 'हे' २ सदस्य संपूर्ण सीझनसाठी झाले नॉमिनेट!
Bigg Boss Nomination : 'बिग बॉस मराठी'च्या घरात चौथ्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. काल विकेंडच्या वारमध्ये नगमा मिरजकर आणि नतालिया जानोस्जेक हे दोन सदस्य घराबाहेर पडले. त्यानंतर आजपासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. जसे-जसे दिवस सरत आहेत, ते-तसे घरातील सदस्यांचे खरे चेहरे दिसायला लागलेत. आता चौथ्या आठवड्याची सुरुवातच एका मोठ्या घटनेने झाली आहे. घरातील दोन सदस्यांना बिग बॉसने थेट संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले आहे, ज्यामुळे सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.
बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये भांडणं होणार नाहीत, असं होऊच शकत नाही. मात्र, शोमध्ये काही नियमदेखील आहेत आणि त्यांचं उल्लंघन केल्यास शिक्षा दिली जाते. आता 'बिग बॉस सीझन १९'मध्येही मोठं भांडण झालं आहे. दोन सदस्यांमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण पोहचल्यानंतर बिग बॉसनं त्यांना शिक्षा देत थेट संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले. हे स्पर्धक आहेत अभिषेक बजाज (Abhishek Bajaj) आणि शेहबाज बडेशा (Shehbaz Badesha).
🚨 BREAKING! Bigg Boss nominated Abhishek & Shehbaz for the entire season as a punishment, not for only 1 week. #BiggBoss19https://t.co/81mnIbYxuX
— BBTak (@BiggBoss_Tak) September 14, 2025
'बिग बॉस'नुकतंच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात किचन ड्युटीवरून कुनिका आणि अमाल मलिक यांच्यात भांडण होताना दिसलं. अमाल मलिक हा कुनिकाला म्हणतो की, "मी किचन सांभाळतो..." त्यावर कुनिका म्हणते, "खूप उपकार झाले..." त्यानंतर अमाल बोलतो, "मी तुमचा आदर ठेवून बोलतो. जर तुमची किचन ड्युटी नाही तर तुम्ही किचनमध्ये का जाता?" यावर कुनिका म्हणाली की, "हा आदर देत आहेस मला..." अमाल म्हणतो, "आदर देणे म्हणजे कुणाचा नोकर होणे असे नाही...".
यावर अभिषेक बजाज म्हणतो की, "लोक अनादर करतात...". त्यानंतर शेहबाज कुनिकाची बाजू घेत अभिषेकशी भांडायला येतो आणि दोघांमध्ये तुफान राडा होतो. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचते. घरातील सदस्य त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अभिषेक बजाज आणि शेहबाजमधील भांडण घरातील इतर सदस्य थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण, प्रकरण हाताबाहेर जाताच बिग बॉस संतापले आणि त्यांनी दोघांना शिक्षा सुनावली.