खऱ्या आयुष्यातही भलतीच बोल्ड आहे 'आश्रम' फेम बबिता, शेअर केला स्विमिंगपूलमधला बिकिनीतील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:27 IST2025-03-13T16:26:57+5:302025-03-13T16:27:19+5:30
सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून चर्चेत आलेली बबीता खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे.

खऱ्या आयुष्यातही भलतीच बोल्ड आहे 'आश्रम' फेम बबिता, शेअर केला स्विमिंगपूलमधला बिकिनीतील फोटो
बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेली आश्रम वेब सीरिज प्रचंड गाजली. बाबा निरालाने त्याच्या भक्तांप्रमाणेच प्रेक्षकांनाही भुरळ पाडली. नुकतंच या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आश्रममध्ये बोल्ड लूकने पम्मीप्रमाणेच बबीतानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'आश्रम' वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये बबीताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळायला होता. बबीताच्या बोल्डनेसची प्रचंड चर्चा रंगली होती. या सीरिजमध्ये बोल्डनेस दाखवून चर्चेत आलेली बबीता खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे. 'आश्रम'मध्ये बबीताची भूमिका अभिनेत्री त्रिधा चौधरीने साकारली आहे. त्रिधाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच त्रिधाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्विमिंगपूलमधील तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचा बिकिनी लूक पाहायला मिळत आहे. तिने हिरव्या रंगाची बिकिनी घातल्याचं दिसत आहे. तर डोळ्याला गॉगल लावून कूल लूक केला आहे.
त्रिधा चौधरी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी, बंगाली आणि तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही मालिका आणि वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. 'आश्रम'ने त्रिधाला लोकप्रियता मिळवून दिली. 'आश्रम'चा पहिला सीझन प्रदर्शित झाल्यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती.