समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:30 IST2025-09-18T17:28:56+5:302025-09-18T17:30:47+5:30
समीर वानखेडेंनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. याचंच विडंबन आर्यनने त्याच्या वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे. जाणून घ्या

समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर
आर्यन खानची 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजची चर्चा होती. बॉलिवूडचे तीनही खान या वेबसीरिजच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहेत. इतकंच नव्हे प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींचा या वेबसीरिजमध्ये कॅमिओ आहे. अशातच 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानने अधिकारी समीर वानखेडेंची चांगलीच खिल्ली उडवली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जाणून घ्या
आर्यन खानने केली समीर वानखेडेंची मस्करी?
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या पहिल्याच एपिसोडमध्ये आर्यन खानने समीर वानखेडेंची चांगलीच मस्करी केल्याचं दिसतंय. या एपिसोडमध्ये असं दिसतं की, बॉलिवूडची पार्टी सुरु असते. इतक्यात पोलिसांची एक गाडी दिसते. ड्रग्जविरोधी मोहिम करणारे अधिकारी या गाडीत बसलेले असतात. या गाडीतून एक अधिकारी उतरतात. त्यांना दिसतं की एक तरुण मुलगा नशा करतोय. ते त्याच्याजवळ जातात. तो मुलगा त्यांना सांगतो. मी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही, तो तिथे उभा आहे तो सेलिब्रिटी आहे. असं म्हणत तो मुलगा दुसऱ्या माणसाकडे बोट दाखवतो.
The Sameer Wankhede cameo in the Bads*** of Bollywood Is too good lol.
— PSG24 (@DOCPSG24) September 18, 2025
Iykyk#Badsofbollywood#AryanKhan#ShahRukhKhan𓀠pic.twitter.com/05PTrvTEsy
त्या ठिकाणी एक बॉलिवूड सेलिब्रिटी नशा करत उभा असतो. अधिकारी त्या मुलाला सोडून त्या कलाकाराला अटक करतात. पुढे त्या सेलिब्रिटीला गाडीत डांबलं जातं. या एपिसोडच्या शेवटी say no to drugs असा संदेश वेगळ्या पद्धतीने देण्यात येतो. अशाप्रकारे 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या एपिसोडमध्ये अधिकारी समीर वानखेडेंची मस्करी करण्यात आली, असं दिसतंय. सीरिजमध्ये ज्या अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे त्याचा चेहरा आणि लूक समीर वानखेडेंशी मिळताजुळता असलेला दिसतो. या अभिनेत्याने केलेला अभिनय हा समीर वानखेडेंचं विडंबन केलंय, अशा पद्धतीचा दिसतो. एकूणच 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील हा सीन चर्चेत आहे.