आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा जबरदस्त ट्रेलर, शाहरुख खान-आमिर -सलमान दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:55 IST2025-09-08T16:53:15+5:302025-09-08T16:55:43+5:30
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा ट्रेलर पाहून तुम्हीही व्हाल आनंदी. बातमीवर क्लिक करुन आताच बघा

आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा जबरदस्त ट्रेलर, शाहरुख खान-आमिर -सलमान दिसणार एकत्र
नेटफ्लिक्सच्या बहुप्रतिक्षित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Bards of Bollywood) या सीरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. गेल्या महिन्यात पहिला टीझर आल्यानंतर आर्यन खानच्या दिग्दर्शन पदार्पणाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच नुकताच या सीरिजचा ट्रेलर आला आहे. सात भागांची ही सीरीज धडाकेबाज आणि मनोरंजक आहे, ज्यात प्रभावी संवाद आणि उत्कंठावर्धक क्षण पाहायला मिळतात. रेड चिलीज एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने निर्मित केलेली ही सीरीज या वर्षातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरत आहे.
या सीरीजच्या केंद्रस्थानी, आसमान सिंग (लक्ष्य) आहे. तो एक महत्त्वाकांक्षी नवा अभिनेता असून त्याची स्वप्नं खूप मोठी आहेत. त्याचा एक मित्र परवेझ (राघव जुयाल), त्याची मॅनेजर सान्या (अन्या सिंग) आणि त्याचे काका अवतार (मनोज पाहवा), आई नीता सिंग (मोना सिंग) आणि वडील रजत सिंग (विजयंत कोहली) त्याच्यासोबत आहेत. यांच्या मदतीने आसमान ग्लॅमर आणि संघर्ष असलेल्या बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश करतो.
लवकरच त्याला कळते की प्रत्येक स्वप्न मिळवण्यासाठी एक किंमत द्यावी लागते. आसमानला सुपरस्टार अजय तलवारच्या (बॉबी देओल) मुलीसोबत, करिश्मा (साहेर बंबा) सोबत कास्ट केले जाते, तेव्हा आसमानला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो. यात हुशार निर्माता फ्रेडी सोडावाला (मनीष चौधरी) आणि पुनरागमन करण्यास उत्सुक असलेला जुना अभिनेता जरज सक्सेना (रजत बेदी) आसमानला आव्हान देतात. या सर्वांमुळे हिंदी सिनेसृष्टीतील एका शानदार, अनोख्या आणि मनोरंजक कथेला सुरुवात होते.
बॉलिवूडच्या कट्टर चाहत्यांसाठी 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा ट्रेलर नक्कीच खास आहे. कारण या सीरिजनिमित्त पहिल्यांदाच 'तीन खान' एकत्र दिसणार आहेत. याशिवाय, रणवीर सिंग, सारा अली खान, एस.एस. राजामौली, बादशाह, दिशा पटानी, अर्जुन कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही सीरीज १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अशाप्रकारे शाहरुख खानचा लेक आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'ही सीरिज नक्कीच खास असणार यात शंका नाही.