Adinath Kothare : 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिजमधील आदिनाथ कोठारेचा लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 18:57 IST2025-10-17T18:57:08+5:302025-10-17T18:57:29+5:30
Adinath Kothare : मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या चर्चेत आहे. तो लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या सीरिजचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Adinath Kothare : 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिजमधील आदिनाथ कोठारेचा लूक चर्चेत
मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच एक खास आणि मोठी घोषणा करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. आदिनाथ लवकरच एका वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या सीरिजचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमधील आदिनाथचा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे.
'झी ५ मराठी ओरिजिनल्स' अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'डिटेक्टिव धनंजय'मध्ये आदिनाथ एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या वेबसीरिजसाठी आदिनाथ अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठी इंडस्ट्रीतील दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन डिटेक्टिव धनंजय या वेबसीरिजची निर्मिती करत आहे. श्रीरंग गोडबोले यांची 'इंडियन मॅजिक आय' आणि आदिनाथ कोठारेची 'स्टोरीटेलर्स नूक प्रायव्हेट लिमिटेड' या दोन मोठ्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून ही सीरिज साकारली जात आहे. कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचे लोकप्रिय पात्र 'धनंजय' या वेब शोमधून उलगडणार आहे. आदिनाथची करारी नजर आणि त्याचे गुप्तहेर कौशल्ये यातून हे रहस्य कसे उलगडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एक अभिनेता म्हणून आपला प्रवास सुरू ठेवत, आदिनाथ आता दुहेरी भूमिका साकारून कायम उत्तम कलाकृतींची निर्मिती करत प्रेक्षकांना विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स देत आहे. आगामी काळातही आदिनाथ 'रामायण' आणि 'गांधी'सारख्या मोठ्या बॉलिवूड प्रॉजेक्ट्सचा महत्त्वाचा भाग असणार आहे.