'प्लस साईज' अभिनेत्री टॅग मिळाल्याने भडकली अंजली आनंद; म्हणाली, "ऋषी कपूर, गोविंदाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 13:01 IST2025-03-02T12:57:29+5:302025-03-02T13:01:12+5:30
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातून अंजली आनंद प्रसिद्धीझोतात आली होती.

'प्लस साईज' अभिनेत्री टॅग मिळाल्याने भडकली अंजली आनंद; म्हणाली, "ऋषी कपूर, गोविंदाला..."
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अंजली आनंद (Anjali Anand) आता 'डब्बा कार्टेल' या सीरिजमध्ये दिसत आहे. नुकतीच ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. अंजली आनंदला तिच्या प्लस साईजमुळेही ओळखलं जातं. उंच आणि वजनदार असल्याने तिला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. मात्र नुकतंच अभिनेत्रीने यावर भाष्य करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. गोविंदा, ऋषी कपूर यांचं नाव घेत ती काय म्हणाली वाचा.
'डब्बा कार्टेल' सीरिजच्या प्रमोशनवेळी अंजली आनंद म्हणाली, "आजही प्रेक्षक प्लस साईज अभिनेत्रीला मुख्य भूमिकेत पाहायला तयार नाहीत. मी वेबसीरिज आणि इतर प्लॅटफॉर्मवर काम करते. पण मुख्य अभिनेत्री म्हणून मोठ्या स्क्रीनवर दिसण्याची मला कोणी संधी देत नाही. हृतिक रोशन आणि गोविंदा यांच्यात किती फरक आहे. पण म्हणून गोविंदाला कोणी प्लस साईज अभिनेता म्हणत नाही. ना ही कोणी ऋषि कपूर यांचा तसा उल्लेख केला होता."
ती पुढे म्हणाली,"माझ्या नावाआधी मात्र नेहमीच प्लस साईज अभिनेत्री असं जोडलेलं असतं. लोकांनी आता हे बोलणं थांबवावं. प्लस साईज असणं नॉर्मल आहे. अनेक लोक मला म्हणतात की मी सोशल मीडियावर प्लस साईज महिलांसाठी आवाज उठवला पाहिजे. पण मला ते करायचं नाही. मला माहितीये असं केल्याने मला काय फायदा होईल पण मी स्वत:ला दुसऱ्यांपेक्षा वेगळी समजतच नाही."
अंजली आनंद याआधी 'राज जवान है' सीरिजमध्ये दिसली होती. यातील तिचा अभिनय सगळ्यांनाच खूप आवडला. तसंच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमानंतर तिचं खूप कौतुक झालं. अंजलीने हिंदी मालिकेतही काम केलं आहे. सध्या ती वेबसीरिज विश्वात नशीब आजमावत आहे.