Aashram Season 4: ‘बाबा निराला की जय’ हो म्हणत बॉबी देओलच्या ‘आश्रम ४’चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 15:28 IST2022-06-04T15:02:47+5:302022-06-04T15:28:52+5:30
Aashram Season 4:आश्रम सीझन 4 चा टीझर रिलीज होताच, सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Aashram Season 4: ‘बाबा निराला की जय’ हो म्हणत बॉबी देओलच्या ‘आश्रम ४’चा टीझर रिलीज
Aashram Season 4 Teaser Released: बॉबी देओलची (Bobby Deol) ‘आश्रम’ (Aashram) ही वेबसीरिज प्रचंड गाजली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या वेबसिरीजचा ३ सीझनही प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. निर्मात्यांनी आगामी सीझन 4 ची घोषणा देखील केली आहे. 'आश्रम' (Aashram)वेबसीरिज चाहत्यांना खूप आवडली आहे, त्यामुळे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी गेल्या 3 वर्षात या वेबसिरीजचे तीन सीझन रिलीज केले आहेत आणि चौथ्या सीझनची घोषणा झाल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. आश्रम सीझन 4 मध्ये यावेळी काय खास असणार आहे ते जाणून घेऊया.
दमदार टीझर आऊट
बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलच्या कारकिर्दीला जोरदार बूस्ट देणारी आश्रम वेबसीरिज खूप खास आहे. बॉबीने गेल्या तीन सीझनमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आश्रम सीझन 4 चा टीझर रिलीज होताच, तेव्हापासून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. नुकताच आश्रमच्या सीझन 4 चा टीझर एमएक्स प्लेयरने रिलीज केला आहे. १ मिनिटाच्या या टीझरमध्ये बॉबी देओल स्वत:ला देव म्हणवताना दिसत आहे. तसेच बाबा निराला आश्रममध्ये प्रवेश करताच ‘बाबा निराला की जय’ म्हणताना त्याचे भक्त दिसत आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक सीझनप्रमाणे पोलिसही त्यांच्या मागे लागले आहेत. मात्र आश्रम 4 मध्ये बाबा निराला पोलिसांच्या हाती लागतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आश्रम सीझन 4 पुढील वर्षी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. मात्र, वेब सीरिजच्या निर्मात्यांनी टीझरसोबत रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. आश्रमच्या 3 सीझनसोबतच चाहत्यांना आश्रमाच्या नव्या सीझनचीही प्रचंड उत्सुकता आहे. आश्रम 4 वेब सीरिजमध्ये बॉबी देओल, चंदन रॉय, अदिती पोहनकर, तुषार पांडे, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी आणि अनुप्रिया गोएंका यांसारखे अनेक सुपरस्टार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.