'बाबा निराला' परत येणार, 'आश्रम' सीझन ४ बद्दल त्रिधा चौधरीने दिले अपडेट; म्हणाली, "शूटिंग..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 11:03 IST2025-12-14T11:03:03+5:302025-12-14T11:03:30+5:30
'आश्रम'मध्ये बबिताच्या भूमिकेत दिसलेली त्रिधा चौधरी म्हणाली...

'बाबा निराला' परत येणार, 'आश्रम' सीझन ४ बद्दल त्रिधा चौधरीने दिले अपडेट; म्हणाली, "शूटिंग..."
अभिनेता बॉबी देओलला करिअरमध्ये दुसरी संधी देणार वेब सीरिज 'आश्रम'. या सीरिजने बॉबीचं नशीबच पालटलं. प्रेक्षकांनी सीरिजला तुफान प्रतिसाद दिला. सीरिजची कथा, कलाकारांचा अभिनय सगळंच दमदार होतं. म्हणूनच सीरिजचे तीन सीझन झाले. तर आता चौथ्या सीझनचीही प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 'आश्रम'मध्ये बबिताच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीने चौथ्या सीझनबाबत अपडेट दिलं आहे.
अभिनेत्री त्रिधा चौधरी 'आश्रम' सीरिजमुळे नॅशनल क्रश बनली होती. सीरिजमध्ये तिने बॉबी देओलसोबत दिलेल्या इंटिमेट सीन्सचीही चर्चा झाली. 'आश्रम'चा चौथा सीझन कधी येणार? यावर प्रतिक्रिया देताना त्रिधा म्हणाली, "हो, २०२६ मध्ये आम्ही चौथ्या सीझनचं शूट सुरु करणार आहोत." 'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना त्रिधाने 'आश्रम'च्या चौथ्या सीझनवर शिक्कामोर्तब केलं.
यावेळी तिने सीरिजमध्ये काम कसं मिळालं याचीही गोष्ट सांगितलं. ती म्हणाली, "मी एका सुपरमार्केटमध्ये होते. तिथे माझी भेट डीए माधवी भट्टशी झाली. ती मला म्हणाली की त्रिधा, 'तुला इथे भेटून मला खूप आनंद झाला. मला खरंच असं वाटतं की तू हा शो केला पाहिजे.' माधवीने प्रकाश झा यांना माझ्याबद्दल सांगितलं. त्यांना मी दिसायला जरा लहान वाटले. त्यांनी मला वजन वाढवण्याचा सल्ला दिला जेणेकरुन मी एक प्रौढ महिला वाटेन. भूमिकेसाठी मी आणखी अनुभवी दिसणं गरजेचं होतं. मला प्रशिक्षण देण्यात आलं. तसंच डायलॉग्सवरही मी काम केलं. आज या सीरिजने मला वेगळी ओळख दिली आहे. मी जिथे जाते तिथे लोक 'जपनाम' म्हणतात. प्रत्येक कलाकारासाठी हा शो एक खास अनुभव होता."
त्रिधा चौधरीने काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तिची 'दहलीज' मालिका खूप गाजली होती. आता त्रिधा कपिल शर्माच्या 'किस किस को प्यार करूं २' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसत आहे.