Aashram 3 : बॉबी देओलच्या 'आश्रम 3'ला रिलीज होताच झटका, ऑनलाईन झाला लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 15:34 IST2022-06-03T15:28:04+5:302022-06-03T15:34:59+5:30
बॉबी देओलची (Bobby Deol) ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. आज या वेबसिरीजचा ३ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Aashram 3 : बॉबी देओलच्या 'आश्रम 3'ला रिलीज होताच झटका, ऑनलाईन झाला लीक
बॉबी देओलची (Bobby Deol) ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. पहिला सीझन हिट झाल्यावर या सीरिजचा दुसरा सीझन आला. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आज या वेबसिरीजचा ३ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आश्रम 3 रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला आहे. मोफत HD डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. खरं तर, वेब सिरीज टॉरेंट साइटवर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
बॉलिवूडलाइफमधील एका रिपोर्टनुसार, बॉबी देओल स्टारर वेब शो तमिलरॉकर्स, टेलीग्राम, फिल्मझिला, मूवीरुल्झ आणि टोरेंट साइटवर लीक झाला आहे. आश्रम 3 ही ऑनलाइन लीक झालेली पहिली वेबसिरीज नाही. यापूर्वी, नेटफ्लिक्सच्या स्ट्रेंजर थिंग्ज 4 व्हॉल्यूम 1, पंचायत 2 आणि इतर सारख्या वेब सीरिज ऑनलाइन लीक झाल्या होत्या. खरं तर, पुष्पा, RRR, KGF 2, भूल भुलैया 2, रनवे आणि इतर सारखे अनेक मोठे बॉलिवूड चित्रपट ऑनलाईन लीक झालेत.
प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये बॉबी देओल, अदिति पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयनका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्ययन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशाद राणा, तन्मय रंजन, प्रीति सूद, राजीव सिद्धार्थ आणि जया सील हे कलाकार दिसतायेत.