हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये विद्युत जामवालचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली रणवीर सिंहची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 01:00 PM2023-12-10T13:00:46+5:302023-12-10T13:01:33+5:30

गेल्या वर्षी अभिनेता रणवीर सिंह सुद्धा न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता.

Vidyut Jammwal did nude photoshoot in the Himalayan mountains netizens recalls Ranveer Singh | हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये विद्युत जामवालचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली रणवीर सिंहची आठवण

हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये विद्युत जामवालचं न्यूड फोटोशूट, नेटकऱ्यांना आली रणवीर सिंहची आठवण

'कमांडो' फेम अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सिनेमातील त्याने स्वत: केलेले स्टंट्स, अॅक्शन सीन्स तर थक्क करणारे असतात. विद्युतचा नुकताच साखरपुडा मोडल्याने तो चर्चेत आला होता. आता त्याने हिमालयात न्यूड फोटोशूट केल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा फोटो पाहून नेटकऱ्यांना रणवीर सिंहचीच आठवण आली आहे. 

गेल्या वर्षी अभिनेता रणवीर सिंह सुद्धा न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला होता. यामुळे खूप खळबळ माजली होती. त्याच्या या कृतीवर बरीच चर्चाही झाली होती. तर नुकतंच अभिनेता रणबीर कपूरने Animal सिनेमात न्यूड सीन दिला. आता विद्युत जामवालचा हा फोटो व्हायरल होतोय. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये विद्युतने हे न्यूड फोटोशूट केलंय. या माध्यमातून त्याने हिमालयाला वंदन केलं आहे. तसंच दरवर्षी ७ ते १० दिवस तो एकटाच हिमालयात वेल घालवतो असंही त्याने लिहिलं आहे. 

या पोस्टसोबतच विद्युतने त्याच्या आगामी सिनेमाचीही घोषणा केली आहे. त्याचा 'क्रॅक' हा चित्रपट पुढील वर्षी 23 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. विद्युतच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी संमिश्र कमेंट्स केल्या आहेत. 'सर अशी काय गरज पडली की हे फोटोशूट करावं लागलं' म्हणत विद्युतला ट्रोल करण्यात आलंय. तर ही आपली जुनी संस्कृती आहे म्हणत त्याला काही लोकांनी पाठिंबाही दिला आहे.

Web Title: Vidyut Jammwal did nude photoshoot in the Himalayan mountains netizens recalls Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.