Urmila Nimbalkar was offered Bigg Boss Marathi | उर्मिलानेही नाकारली ‘बिग बॉस’ची ऑफर? Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:48 IST2021-09-23T15:48:29+5:302021-09-23T15:48:45+5:30
अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत असून उर्मिला सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते. नुकताच ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आलीये. उर्मिला सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असून ती तिच्या इन्स्टाग्रामवर क्वेशन आणि अंन्सर हा गेम खेळत असताना तिला एका युजने “आम्हाला तुम्हाला बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल.” असा प्रश्न विचारलाय. या उत्तर देत तिने “काही वर्षांपूर्वी बिग बॉससाठी मला विचारण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव मी नाही म्हणाले. आणि तुम्हाला असं का वाटतं की मी बिग बॉसच्या घरात survive करू शकेन.” असं लिहिलयं. तिच्या उत्तरामुळे उर्मिला सध्या बरीच चर्चेत आहेत.