Next

Shashank Ketkar Emotional Post | खलनायक 'समर'साठी शशांकची भावूक पोस्ट | Lokmat Filmy a

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:21 PM2021-08-30T14:21:07+5:302021-08-30T14:21:35+5:30

मराठी टेलिविश्वातला आदर्श मुलगा, आदर्श नवरा, आदर्श भाऊ अशी बिरुद मिरवणारा अभिनेता शशांक केतकरला जेव्हा पाहिलं न मी तूला मालिकेत समरची भूमिकेत पाहिलं तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. नायक नहीं खलनायक हूं मैं...म्हणत शशांकनं ही भूमिकाही उत्तम पार पाडली. जितकं प्रेम प्रेक्षकांनी श्री आणि सिद्धार्थवर केलं तितकाच समरचा तिरस्कारही केला. हीच शशांकला त्याच्या अभिनयासाठी मिळालेली प्रशंसेची पावती आहे.आणि म्हणूनच समरच्या भूमिकेचा अखेर शेवट झाला तेव्हा शशांकदेखील भावूक झाला. पाहिलं न मी तूला ही मालिका संपली. यावेळी शशांकने सेटवरचे ऑनस्क्रीन ऑफस्क्रीन फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करत त्यानं एक भावनिक पोस्ट देखील शेअर केलीये.