Prajakta Mali Trolled | 'हिन्दी नायाब है' म्हणणारी प्राजक्ता झाली ट्रोल | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:14 IST2021-09-08T14:14:28+5:302021-09-08T14:14:41+5:30
अभिनेत्री प्राजक्ता माळी हीने फक्त छोटा पडदाच नाही तर मोठा पडदाही आपल्या अभिनयाने गाजवला आहे. नुकताच महिन्याभरापूर्वी प्राजक्ताच्या प्राजक्तप्रभा या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. यामुळे प्राजक्ताची कवयित्री अशी नवी ओळख तिच्या चाहत्यांना झाली. प्राजक्ताचे संस्कृत भाषेवरील प्रेम तर आपल्याला माहितच आहे. तिनं तिच्या भाचींची नाव संस्कृत नधील नावांवर ठेवलीयेत. त्यांचा अर्थही तिनं चाहत्यांना सांगितला होता. नुकताच प्राजक्ताने एक हिंदी एक हकिकत-इसलिए हिंदी नायाब है नावाची कविता शेअर केली. प्राजक्ताने या कवितेला-भारतीय भाषा भारीच आहेत, ह्याचं हे बोलकं उदाहरण फक्त अभिमान नव्हे “गर्व” #हिन्दी #मराठी #तेलुगू अशी कॅप्शन दिलीये. पण त्यामुळे तिचा मराठीतला चाहता वर्ग नाराज झालाय. या कवितेमुळे तीला ट्रोल करण्यात येतय. प्राजक्ता मराठीला प्राधान्य न देता हिंदीचे गोडवे का गात आहे असा सवाल तिला कमेंटमध्ये विचारला जातोय.