Next

Pooja Sawant Post for Daughters Day | 26 Sep |'कन्या दिना'निमित्त पूजाचा आईवडिलांसोबत भावनिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 17:54 IST2021-09-24T17:54:32+5:302021-09-24T17:54:53+5:30

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ही अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. पूजा सोशल मिडीयावरही बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक व्हि़डीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जुन्या आणि नव्या फोटोंचा सुंदर व्हिडीओ बनवून तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. कारण व्हिडीओ पोस्ट करण्याचं कारणंही तितकचं खास आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पूजाने डॉटर्स डेनिमित्त शेअर केलाय. येत्या २६ सप्टेंबर रोजी डॉटर्स डे म्हणजेच कन्या दिवस आहे. 'डॉटर्स डे'निमित्तची उत्सुकता जाहीर करत पूजाने हा व्ह़िडीओ डॉटर्स डेच्या दोन दिवस आधीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. तर तुम्हाला पूजाने शेअर केलेला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.