MYRA VAIKUL got special gift from his fan | चाहत्याची मायरासाठी अनोखी भेट | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 13:51 IST2021-09-24T13:50:56+5:302021-09-24T13:51:07+5:30
झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील बालकलाकार मायरा वायकुळ तर आता सर्वांचीच लाडकी आणि आवडती झालीये. सोशल मिडियावर तर मायरा आधीच लोकप्रिय होतीच, पण मालिकेत परीच्या भूमिकेत झळकू लागल्यानंतर तिला आणखीनच लोकप्रियता मिळालीये. तसेच तिचा चाहतावर्ग ही बराच वाढू लागलाय. नुकताच एका चाहत्याने तिच्यासाठी एक खास गिफ्ट तयार केलंय. एका चाहत्याने मायराची गणपती बाप्पासोबत थ्रीडी रांगोळी काढलीये. ओमकार नलावडे या कलाकाराने कलेच्या अधिपतीला कलेतून वंदन केलंय. ही रांगोळी मायरा इतकीच गोड आणि सुंदर आहे. पाहूयात मायरासाठी तिच्या फॅनने केलेल्या या फॅन आर्टची झलक...