Deepa Kartik Doughther's first Look Viral | Rang Maza Vegla मालिकेत लीप | Lokmat Filmy
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 12:32 IST2021-09-16T12:32:44+5:302021-09-16T12:32:58+5:30
ही गोड मुलगी कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...ही चिमुरडी आहे दीपाची मुलगी कार्तिकी...आहे ना दीपासारखीच गोड आणि समजूतदार. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका आता रंजक वळणावर येवून पोहचली आहे. मालिका लवकरच लीप घेत आहे. दीपाच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या मोठ्या होतील. कार्तिकी ही दीपाकडे मोठी होईल. तर दीपिकाला कार्तिक सांभाळेल. पण या दोघी आयुष्याच्या एका वळणावर एकमेकींना भेटणार आहेत. एकीकडे आई आहे तर दुसरीकडे बाबा. या दोघींमध्ये मैत्री होताना आपल्याला पहायला मिळेल.