Bigg Boss WINNER Sidharth Shukla Passaway | हा प्रसिद्ध शो ठरला असता सिद्धार्थचा शेवटचा शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:57 IST2021-09-02T17:52:22+5:302021-09-02T17:57:50+5:30
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. त्याच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचे हार्ट अटॅकने निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला बरीच लोकप्रियता मिळवून दिली. "बालिका वधू" मधील त्याने साकारलेल्या शिव या भूमिकेमुळे तो घराघरात पोहचला. सिद्धार्थच्या निधनानंतर 'बालिका वधू'चे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे बालिका वधू याच लोकप्रिय मालिकेतील तीन प्रसिद्ध आणि लीड भूमिका साकाणाऱ्या कलाकारांचे निधन झाले.