विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:49 IST2025-12-26T09:48:48+5:302025-12-26T09:49:26+5:30
कतरिनाच्या फोटोवर चाहत्यांचा एकच प्रश्न...

विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
अभिनेत्री कतरिना कैफने गेल्या महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला. विकी कौशल बाबा झाला. सध्या कौशल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई झाल्यानंतर कतरिना कैफची आता झलक दिसली आहे. काल विकी आणि कतरिनाने कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. दरवर्षी दोघंही ख्रिसमस सेलिब्रेशनचा फोटो शेअर करत असतात. मात्र यावर्षीचा फोटो खास आहे. लेकाच्या जन्मानंतरचा त्यांचा हा पहिलाच ख्रिसमस आहे.
कतरिना कैफने विकी आणि सनी सोबत फोटो शेअर केला आहे. यात तिचा भाऊही दिसत आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिना सुंदर दिसत आहे. तर विकी, सनीने सांताची कॅप घातली आहे. आई झाल्यानंतर कतरिनाची पहिली झलक यातून दिसत आहे. तसंच मागे ख्रिसमस ट्री सजवला आहे. तिच्या चेहऱ्यावर न्यू मॉमचा ग्लो पाहायला मिळत आहे. 'सगळ्यांना प्रेम, आनंद आणि शांती मिळो...मेरी ख्रिसमस'.
कतरिनाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत 'बेबी कौशल कुठे आहे' असा प्रश्न विचारला आहे. सगळेच विकी-कतरिनाच्या मुलाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ७ नोव्हेंबर रोजी कतरिनाने बाळाला जन्म दिला. आता बेबी कौशल दीड महिन्याचा झाला आहे. अद्याप दोघांनी लेकाचं नाव रिव्हील केलेलं नाही. त्यामुळे चाहते नाव जाणून घेण्यासाठीही उत्सुक आहेत.
कतरिना कैफ बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. 'मेरी ख्रिसमस' सिनेमात ती शेवटची दिसली होती. तर दुसरीकडे विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्याने 'छावा' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. आता तो संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे.