'आमचा लाडका...', विकी-कतरिनाने सांगितलं लेकाचं नाव; फोटो पोस्ट करत दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:06 IST2026-01-07T16:57:11+5:302026-01-07T17:06:21+5:30
Vicky-Katrina Kaif Son Name: युनिक नावांच्या ट्रेंडमध्ये विकी-कतरिनाने मात्र साधं, सरळंच नाव निवडलं आहे.

'आमचा लाडका...', विकी-कतरिनाने सांगितलं लेकाचं नाव; फोटो पोस्ट करत दाखवली झलक
Vicky-Katrina Kaif Baby Name: विकी कौशल आणि कतरिना कैफ काही दिवसांपूर्वीच आईबाबा झाले. ७ नोव्हेंबर रोजी कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला. आज ७ जानेवारी रोजी त्यांचा मुलगा दोन महिन्यांचा झाला आहे. दोघांनी लेकाचं नाव काय ठेवलं असा प्रश्न चाहते अनेक दिवसांपासून विचारत होते. आज अखेर दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लेकाचं नाव रिव्हील केलं आहे. युनिक नावांच्या ट्रेंडमध्ये विकी-कतरिनाने मात्र साधं, सरळंच नाव निवडलं आहे.
विकी कौशल आणि कतरिनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. लेकाचा चिमुकला हात दोघांनी हातात घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. तर कॅप्शनमध्ये कतरिनाने मुलाचं नाव सांगितलं आहे. ती लिहिते, 'आमचा लाडका विहान कौशल. प्रार्थनांना यश आलं. आयुष्य खूप सुंदर आहे. विहानच्या जन्मानंतर आमचं जग क्षणार्धात बदललं. आभार मानायला शब्द अपुरे पडत आहेत.'
विहान नावाचा अर्थ (Vihaan Name Meaning in Marathi)
विहान हा संस्कृत शब्द आहे. या नावाचा अर्थ नवी सुरुवात असा होतो. कतरिना आणि विकीच्या लेकाचं हे नाव चाहत्यांनाही खूपच आवडलं आहे. आता छोट्या विहानचा चेहरा पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. कतरिनाच्या या पोस्टवर परिणिती चोप्राने 'लिटिल बडी' अशी कमेंट केली आहे. परिणीतीही काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलाची आई झाली. तिने लेकाचं नाव 'नीर' ठेवलं आहे. विशेष म्हणजे विकी कौशलच्या 'उरी' सिनेमात त्याचं नाव विहानच होतं.