सिंघमची पोलिसांना अनोखी भेट

By Admin | Updated: August 20, 2014 21:44 IST2014-08-20T21:44:49+5:302014-08-20T21:44:49+5:30

बॉलीवूड स्टार आपल्या प्रेयसीला कोणतेही गिफ्ट देण्यास तयार असतात; परंतु पहिल्यांदाच एखाद्या स्टारने पोलिसांना दोन आधुनिक गाडय़ांची भेट दिली आहे. ‘

Unique gift to Singhamchi police | सिंघमची पोलिसांना अनोखी भेट

सिंघमची पोलिसांना अनोखी भेट

बॉलीवूड स्टार आपल्या प्रेयसीला कोणतेही गिफ्ट देण्यास तयार असतात; परंतु पहिल्यांदाच एखाद्या स्टारने पोलिसांना दोन आधुनिक गाडय़ांची भेट दिली आहे. ‘सिंघम रिटर्न्‍स’मध्ये बाजीराव सिंघम या पोलीस अधिका:याची भूमिका साकारणा:या अजय देवगणने महाराष्ट्र पोलिसांना दोन आधुनिक वाहने भेट दिली आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे देवगणने ही वाहने सोपवली. या वाहनांचा उपयोग पोलीस करणार आहेत. वाहने भेट देण्याप्रसंगी ‘सिंघम रिटर्न्‍स’चा निर्माता रोहित शेट्टीदेखील उपस्थित होता. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अजय आणि रोहित हे वरळीला रवाना झाले. तेथील दहीहंडी महोत्सवात त्यांनी धूम केली. 

 

Web Title: Unique gift to Singhamchi police