सुमोना चक्रवर्तीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 17:00 IST2018-04-09T16:58:38+5:302018-04-09T17:00:07+5:30

सुमोनाने नुकतेच हॉट फोटोशूड केले असून तिचे फोटो सोशल मीडियात धूमाकूळ घालत आहेत.

TV Actress Sumona Chakraborty's Hot photo shoot | सुमोना चक्रवर्तीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ

सुमोना चक्रवर्तीच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियात धुमाकूळ

मुंबई : कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेन्ड सुमोना चक्रवर्ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिची ही चर्चा सिनेमा किंवा शो मुळे नाहीतर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे होत आहे. 

सुमोनाने नुकतेच हॉट फोटोशूड केले असून तिचे फोटो सोशल मीडियात धूमाकूळ घालत आहेत. सुमोनाचे हे फोटो फोटोग्राफर दिनेश आहूजाने काढले आहेत. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हे फोटो शेअर केले आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी सुमोना चक्रवर्ती ही लग्नाच्या अफवेमुळे चर्चेत आली होती. पण नंतर तिनेच स्पष्टीकरण दिले होते की, ती इतक्यात लग्न करणार नाही. चर्चा होती की, सुमोनाने बंगाली सिनेमाशी निगडीत सम्राट मुखर्जीसोबत लग्न करणार आहे. 

सम्राट हा केवळ आपला मित्र आहे असे सुमोनाने स्पष्ट केले होते. त्यासोबतच हेही सांगितले होते की, सध्या तिच्या आयुष्यात कुणीही नाहीये. ती सिंगल आणि खूश असल्याचं तिने सांगितलं होतं.

पण आता तो विषय मागे पडला आहे. आता सुमोना ही या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

Web Title: TV Actress Sumona Chakraborty's Hot photo shoot