बाबो! राहत्या घरात नोकराला पुरलं, कबरीवर मिर्ची-कोथिंबीर पिकवली अन्...;'हा' सिनेमा बघून उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:25 IST2026-01-13T16:15:39+5:302026-01-13T16:25:48+5:30
सध्याच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर असे अनेक चित्रपट आहेत जे त्यांच्या जबरदस्त कथेमुळे बिग बजेट सिनेमांनाही मागे टाकतात.

बाबो! राहत्या घरात नोकराला पुरलं, कबरीवर मिर्ची-कोथिंबीर पिकवली अन्...;'हा' सिनेमा बघून उडेल झोप
Murder Mystery Cinema : सध्याच्या डिजिटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि युट्यूबवर असे अनेक चित्रपट आहेत जे त्यांच्या जबरदस्त कथेमुळे बिग बजेट सिनेमांनाही मागे टाकतात. सध्या अशाच एका सिनेमाची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची कथा एका नोकराच्या हत्येभोवती आणि त्यानंतर घडणाऱ्या भयानक घटनांभोवती फिरते. हा सिनेमा एकदा तुम्ही तो पाहिला की तर त्याची गोष्ट तुम्ही विसरुच शकणार नाहीत. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.8 रेटिंग मिळाले आहे, जे त्याच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. चला तर मग जाणून घेऊयात...
२०१६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला युट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज आहेत. या शॉर्ट फिल्मचे नाव 'चटनी' (Chutney) असं आहे. हा बहुचर्चित चित्रपट तुम्ही युट्यूबवर बघू शकता. टिस्का चोप्रा, रसिका दुगल, आदिल हुसैन आणि सुमित गुलाटी हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. १७ मिनिटांची ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित झाल्यापासून तिला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.आजही हा सिनेमा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
असं आहे कथानक
'चटनी' गाझियाबादमधील एका अनिता नावाच्या गृहिणीची कथा आहे. एका पार्टीत आपल्या पतीसोबत फ्लर्ट करणाऱ्या एका तरुणीला (रसिका दुग्गल) ती घरी बोलावते. यादरम्यान, गप्पांच्या ओघात ही गृहिणी त्या तरुणीला एक जुनी गोष्ट सांगते. ती सांगते की, त्यांच्या घरी काम करणाऱ्या 'भोला' नावाच्या नोकराला विष देऊन मारण्यात आले होते. इतकेच नाही तर त्याला घराच्या अंगणातच दफन करण्यात आले आणि त्याच्या कबरीवर कोथिंबीर (धणे) पिकवण्यात आली. ही कोथिंबीर नंतर घरच्या जेवणात आणि चटणी बनवण्यासाठी वापरली जायची, असा अंगावर काटा आणणारा खुलासा ती करते.चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसतो, ज्यामुळे ही कथा निव्वळ एक गप्पा नसून एक धमकी असल्याचे लक्षात येते.
टिस्का चोप्राने यात एका सामान्य दिसणारी पण तितकीच चलाख असलेल्या अनिताची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.या फिल्ममधील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. ज्योती कपूर दास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.