"पूजासारखी गोड मुलगी...", सोहम बांदेकरसाठी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने लिहिलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:47 IST2025-12-04T18:45:50+5:302025-12-04T18:47:45+5:30
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी नुकतीच लग्नबंधनात अडकली.

"पूजासारखी गोड मुलगी...", सोहम बांदेकरसाठी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने लिहिलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाली...
Kirti Pendharkar Post: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी नुकतीच लग्नबंधनात अडकली. २ डिसेंबर रोजी पूजा आणि सोहमचं लग्न लोणावळ्यात मोठ्या थाटामाटात पार पडलं. पूजा आणि सोहम यांच्या लग्नात मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या जोडप्याला शुभेच्या देण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांच्या लग्नानंतर ठरलं तर मग मालिकेतील एका अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे.
ठरलं तर मग मालिकेत सायलीच्या आईच्या भूमिकेत झळकलली अभिनेत्री कीर्ती मेहेंदळे पेंढारकर हिने पूजा-सोहमच्या लग्नानिमित्ताने सुंदर पोस्ट लिहिली आहे.या पोस्टला भावुक कॅप्शन देत अभिनेत्रीने म्हटलंय, "प्रिय सोहम...माझं आणि आकाश चं लग्न झालं त्या वर्षी आठवीत असशील. तुझा आकाश दादा तुला खूप प्रिय. पण आकाशला तू दादा म्हणतोस आणि मला मात्र काकू, कारण मला पीडायला तुला खूप आवडत.आठवीतला चब्बी चब्बी सोहम् पासून फुटबॉल खेळून, जिम करून फिट झालेला सोहम्. निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्यावर थोडासा बावरलेला पण सगळं शिकण्याची तयारी असलेला आणि आता सेट वर confidently वावरत असलेला सोहम् मी पहिला आहे. तुझ्या लग्नात या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून गेल्या."
त्यानंतर पुढे अभिनेत्रीने म्हटलंय, "पूजा सारखी सगळ्यांना आपलंस करून घेणारी गोड मुलगी तुला life partner म्हणून लाभली आहे. हे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहूदे आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊदेत या तुम्हाला मनापासून शुभेच्छा..." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. तर पूजा ही टीव्ही अभिनेत्री आहे. या दोघांनी आयुष्यभराची गाठ बांधली आहे.या दोघांचं लग्न मुंबई नाही तर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडलं. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती.